TRENDING:

Video: सोशल मीडियातून कसे मिळवायचे पैसे? भाडिपा फेम सारंग साठ्येच्या खास टिप्स

Last Updated:

सोशल मीडियातून आपण पैसे मिळवू शकता. पण कसे? भाडिपा फेम सारंग साठ्येंनी टिप्स दिल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर, 29 ऑगस्ट : आजकाल तरुणांमध्ये नोकरीपेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असणे किंवा उत्पन्नाचा एक स्वतःचा स्त्रोत असणे हे गरजेचे बनले आहे. त्यामुळेच बरेच जण सोशल मीडियासाठी कंटेंट बनवून पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळणे तितकेच अवघड असते. म्हणूनच कंटेंट क्रिएशन विषयी आपण काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, याबाबत भाडिपा या प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे संस्थापक असलेल्या सारंग साठ्ये यांनी काही टिप्स नवीन कटेंट क्रिएटर्सना दिल्या आहेत.
advertisement

आधीच्या काळापेक्षा सोशल मीडिया बेस्ट

सुरुवातीला कंटेंट क्रिएशन या क्षेत्रात उतरणे किंवा या क्षेत्रात आपले नाव कमावण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी येणे ही गोष्टच बऱ्याच जणांना संभ्रमात टाकणारी वाटते. यातून आपल्याला पैसे मिळतील का नाही याचाच विचार सुरुवातीला केला जातो. पण निश्चितच तरुणांनी या क्षेत्रात आले पाहिजे. कारण या माध्यमाची ताकदच इतकी आहे की हे क्षेत्र सर्वांसाठी मोफत खुले असते. पूर्वी प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा काही चित्रपट, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज अशा नवनवीन गोष्टी बनवण्यासाठी वेगवेगळे टप्पे पार करावे लागायचे. त्यात काही ठिकाणी आपल्याला साफ निराशा यायची तर काही ठिकाणी आपल्याला दादही दिली जात नसे, असं सारंग सांगतात.

advertisement

दीड वर्षापर्यंत बोलता येत नव्हतं, दुसऱ्याच वर्षी केला वर्ल्ड रेकॉर्ड! ठाण्याच्या समर्थची भन्नाट कामगिरी

सोशल मीडियावर पूर्ण अवलंबून राहता येते?

सोशल मीडियावर तुमचा प्लॅटफॉर्म किंवा तुमच्या चैनलवरचा कंटेंट तुमच्या हातात आहे. त्यामुळे सगळा विचार करून आणि योग्य पद्धतीने तुम्ही या क्षेत्रात आलात तर या क्षेत्रात करिअर करणे शक्य आहे. फक्त करिअर करताना या क्षेत्रात दुरगामी विचार करणे गरजेचे आहे. सोशल मीडिया हे ट्रेंडच्या आधारावर चालते. जसा आजूबाजूचा ट्रेंड असेल तसेच आपण वागणे गरजेचे आहे. सध्या कशाचा ट्रेंड आहे, काय चलन आहे, यावर आपण जर लक्ष ठेवले. तर नक्कीच सोशल मीडिया मधून चांगला पैसाही कमवता येतो आणि एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्त्रोतही यातून निर्माण करता येतो, असे सारंग साठ्ये यांनी सांगीतले आहे.

advertisement

कंटेंट क्रिएशन करुन किती पैसे कमावणे शक्य?

खरं पाहायला गेलं तर सोशल मीडिया द्वारे कसे आणि किती पैसे कमवू शकतो, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. या माध्यमातून अगदी कोट्यावधी रुपये देखील कमवता येतात आणि उपजीविकेसाठी गरजेचे असलेले थोडे थोडकेच पैसेही कमवता येतात. मात्र आपण कोणत्या मार्गाने जायचे हे पूर्णपणे आपण ठरवावे लागते. मात्र आज मोठमोठे कंटेंट क्रियेटर्स कोट्यावधी रुपये कमवत असताना प्रत्येकाला ती गोष्ट शक्य असेल असे नाही आणि प्रत्येकाला सगळे मिळेलच असेही नाही, असेही सारंग यांनी स्पष्ट केले.

advertisement

Video : झोपडीत राहणाऱ्या मुलाची भरारी, रॅप साँगमधून करतोय समाजात जागृती

आपण काय आहोत हे लक्षात ठेवणे गरजचे?

सोशल मीडियासाठी कंटेंट बनवताना आपण काय प्रकारचा आणि कशा पद्धतीचा कंटेंट बनवतोय हे जाणून घेणे गरजेचे असते. आपण किती चांगलं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. याचा प्रयत्न नेहमी करत राहायला हवा. कारण त्या प्रमाणात आणि तितकी प्रसिद्धी मिळेलच असे नाही, असे सांगत सारंग यांनी दिग्गज अभिनेते मनोज वाजपेयी आणि शाहरुख खान यांचेही उदाहरण दिले. हे दोघेही साधारण एकाच वयाचे असून दोघांचाही प्रेक्षक वर्ग वेगळा आहे आणि दोघांची प्रसिद्धीही तितकीच वेगवेगळ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या श्रेणीमध्ये आपण कुठे आहोत हे ओळखले पाहिजे. हे सगळया गोष्टी डोक्यात ठेवूनच तुम्ही या क्षेत्रात उतरा असा सल्लाही सारंग साठ्ये यांनी दिला आहे.

advertisement

दरम्यान, सारंग साठ्ये यांनी दिलेल्या या टिप्स सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरणार आहेत. एकंदरीत या क्षेत्राचा चांगल्या प्रकारे अभ्यास करत, योग्य प्रकारे योजना आखत या क्षेत्रात उतरल्यास नक्कीच यश मिळण्याची दाट शक्यता असते, असे सारंग साठ्ये यांचे मत आहे.

मराठी बातम्या/करिअर/
Video: सोशल मीडियातून कसे मिळवायचे पैसे? भाडिपा फेम सारंग साठ्येच्या खास टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल