कोल्हापूर : एखाद्या महिलेने जर ठरवले तर ती काहीही साध्य काही करु शकते. कोल्हापूरच्या 2 महिलांनी अशाच प्रकारे शून्यातून आपला व्यवसाय सुरू केला आणि केवळ 4 वर्षात त्या लाखोंच्या घरात कमाई करत आहेत. महिला बचत गटाची साथ घेऊन आपल्या छोट्याशा व्यवसायाला त्यांनी एक मोठे स्वरूप मिळवून दिले आहे. त्यामुळेच आज हा महिला स्वयंसहायता समूह इतरांसाठी आदर्श ठरत आहे.
advertisement
कोल्हापूरच्या गारगोटी येथील विद्या माणगांवकर आणि सुरेखा सोनार यांनी स्वतःची ओळख निर्माण करणे व समाजकार्यात खारीचा वाटा उचलणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून एक छोटा व्यवसाय सुरू केला. ज्यामध्ये वेगवेगळ्या 9 प्रकारचे लाडू 70 प्रकारचे चिवडा, 5 प्रकारच्या चकली अशा अनेक घटकांचा समावेश आहे.
कोल्हापूरची शिक्षिका झाली 'ग्लोबल टिचर'; जगभरातील 3 लाख शिक्षकांतून निवड, कसं मिळालं यश? Video
2019 साली या दोघींनी फक्त भिशीच्या साठवलेल्या 50 हजार रुपये गुंतवणुकीतून 'सुगरण महिला गृहउद्योग' ची स्थापना केली होती. परीसरात सर्वे केल्यानंतर नागरिकांना चपाती आणि भाजीची गरज जास्त आहे हे लक्षात आले. म्हणूनच घरगुती व पारंपारिक पदार्थ बनवायचे ठरवले होते. महिला असल्यामुळे वेळेचे बंधन, बाहेर जाऊन मार्केटिंग करायला घरातून विरोध, पैशांचा प्रश्न अशा अनेक समस्यांवर मात करत व्यवसाय यशस्वी केल्याची माहिती सुरेखा सोनार यांनी सांगितले आहे.
कशी झाली प्रगती?
छोट्या स्वरूपात सुरू करुन पुढे मग प्रदर्शन, नंतर मागणी नुसार पुरवठा अशा पद्धतीने त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. बचत गटामार्फत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडूनही वेळोवेळी सहकार्य आणि कर्ज त्यांनी मिळवले. त्यातूनच मशीन्स विकत घेऊन त्या स्वतःच्या व्यवसायाला गती मिळवून देऊ शकल्या. आजवर त्यांच्या सोबत कोटोट्र महिला त्यांच्या समुहमार्फत चांगली कमाई करत आहेत. दोघी-तिघींवर सुरु झालेल्या या सुगरण स्वयंसहायता समूहात आज 15 महिला काम करत आहेत. सुरुवातीला फक्त 60,000 रुपयांचा टर्नओव्हर करणाऱ्या या समूहाने आज 10 ते 12 लाख रुपये टर्नओव्हर पर्यंत मजल मारली आहे.
शेवटी आईच ती.., पोटच्या पोरासाठी किडनी देणार, पण उपचाराचा खर्च कसा करणार? Video
काय-काय आहेत सध्याची उत्पादने?
चिवडा :- लाल चिवडा, गहु चिवडा, गुलमोहर चिवडा, बाजरी चिवडा, नाचणी चिवडा, सातू चिवडा, ज्वारी चिवडा
लाडू :- रवा लाडू, शेंगदाणा लाडू, मोतीचूर लाडू, भुरा बेसन लाडू, नाचणी लाडू, मुग लाडू, तीळ लाडू, हळीव लाडू, ड्रायफुट लाडू
चकली :- भाजणी चकली, नमकीन चकली, नाचणी चकली, पालक चकली, मेथी चकली
भडंग :- ज्वारी भडंग, सोयाबीन भडंग, नाचणी भडंग
शेव :- टोमॅटो शेव, साधी शेव, लसूण शेव, पालक शेव, नाचणी शेव
पापडी :- साधी पापडी, पालक पापडी, टोमॅटो पापडी
चिक्की :- शेंगदाना चिक्की, तीळ चिक्की, फुटाना चिक्की
इतर :- शंकरपाळी, खाजा, करंजी, साठा करंजी, बालूशाही, मखमल पुरी, खजूर बर्फी
दरम्यान, असे म्हटले जाते की, मनात इच्छा आणि साथीला माणसं असतील, तर काहीही शक्य होऊ शकते आणि तेच या दोघी महिलांनी करून दाखवले आहे. त्यामुळेच इतरांना देखील त्या प्रेरित करत आहेत.