फसवणुकीचा प्रकार
तुषार भोंडवे (वय 32, चिंचोली बंदर, मालाड) हे घर खरेदीसाठी प्रयत्नशील होते. त्यांचा सहकारी उदय काळे (32) याने त्याचा नातेवाईक सतीश नाडर (33) कंत्राटदार असल्याचे सांगून स्वस्तात म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कांदिवली महावीरनगर येथील इमारतीत 15 व्या मजल्यावरील फ्लॅट मिळवून देण्याचा दावा नाडरने केला. मात्र, भेटीवेळी म्हाडा कार्यालय बंद असल्याचे कारण देत घर न दाखवता, त्यांनी भोंडवे यांची ओळख निजाम शेख याच्याशी करून दिली. शेखने स्वतःला म्हाडाचा अधिकारी असल्याचे भासवून 37 लाख रुपयांत 305 चौरस फुटांचे घर देण्याचा प्रस्ताव ठेवला.
advertisement
MS धोनीला बॅटिंग जमेना, थालासोबत असं का घडतंय? काय आहे कारण?
प्रलोभन आणि फसवणूक
शेखने घरासाठी 11 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशनसाठी लागतील, तसेच उर्वरित रक्कम कर्जाद्वारे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. विश्वास बसावा म्हणून डिसेंबर 2024 मध्ये बनावट ई-मेल पाठवण्यात आला. टप्प्याटप्प्याने 7 लाख 3 हजार रुपये भोंडवे यांनी दिले. मात्र, त्यानंतर आरोपींनी वेगवेगळी कारणे देत घराबाबत पुढील प्रक्रिया टाळली. संशय आल्याने भोंडवे यांनी म्हाडा कार्यालयात चौकशी केली असता, हा संपूर्ण व्यवहार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस कारवाई
तुषार भोंडवे यांच्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी उदय काळे, सतीश नाडर आणि निजाम शेख यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 3(5) आणि 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.