TRENDING:

Aai Kuthe Kay Karte Last Episode : 'बाबा आई गेली...', मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा मृत्यू ?

Last Updated:

Aai Kuthe Kay Karte Last Episode Arundhati Death : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या अंतिम भागातील एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात अरुंधतीचा अपघात होतो आणि तिचा मृत्यू होतो असं दाखवण्यात आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेच्या शेवटी काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मालिकेचे अंतिम भाग सध्या टेलिव्हिजनवर सुरू आहेत. ज्यातील लेटेस्ट एपिसोडमध्ये अरुंधतीचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळतंय. अरुंधतीच्या मृत्यूच्या बातमीने अनिरुद्धला शॉक बसल्याचे दिसतंय. मालिकेत अरुंधतीचा मृत्यू नेमका कसा झाला? अंतिम भागात नेमकं काय घडणार?
आई कुठे काय करते
आई कुठे काय करते
advertisement

'आई कुठे काय करते' मालिकेच्या अंतिम भागातील एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात अरुंधतीचा अपघात होतो आणि तिचा मृत्यू होतो असं दाखवण्यात आलं आहे. अनिरुद्धने कर्ज घेतलेले गुंड अरुंधतीला त्रास देतात. संजना त्यांच्याशी हातमिळवणी करून अरुंधतीला धमकावयाला सांगतात. गुंड तिच्यावर हल्ला करतात पण अरुंधती त्यांच्याशी दोन हात करून तिथून पळ काढते. रस्त्यावरून पळत असताना अरुंधतीला एका कारची धडक बसते आणि तिचा अपघात होतो.

advertisement

( Aai Kuthe Kay Karte : अरुंधती होणार रिटायर्ड, नव्या आईची जॉइनिंग! मराठी TV वर नवा ड्रामा )

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळतंय की, अरुंधतीचा अपघात होतो तिथे अनिरुद्ध आणि संजना उभे असतात. अरुंधतीचा अपघात झाल्याचे पाहताच अनिरुद्ध हादरतो. "संजना आपण भोसलेला फक्त तिला धमकवायला सांगितले होते पण त्याने तिला मारलं", असं म्हणतो, त्यावर संजना त्याला म्हणते, "आपण इथून सटकूया, तू इथून चल." संजना आणि अनिरुद्ध तिथून निघून जातात.

advertisement

पुढे अनिरुद्धला रात्री अभिचा फोन येतो. अभि त्याला फोनवर सांगतो की, "बाबा आई गेली." अभिचे बोलणं ऐकून अनिरुद्धला मोठा धक्का बसतो. अनिरुद्धच्या हातातून फोन पडतो आणि दुसरीकडे समृद्धी बंगल्याचा दरवाजा उघडतो, समोरून एक कार समृद्धी बंगल्याच्या दिशेने येताना दिसते.

advertisement

मालिकेच्या शेवटी खरंच अरुंधतीचा मृत्यू होणार का? की संजना आणि अनिरुद्धला धडा शिकवण्यासाठी हे नाटक असणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे मालिकेचा शेवटचा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Aai Kuthe Kay Karte Last Episode : 'बाबा आई गेली...', मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा मृत्यू ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल