रविंद्र बेर्डे त्यांच्या जाण्यानं बेर्डे कुटुंबात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. स्वानंदी आणि अभिनय यांच्या आयुष्यात त्यांचं खूप महत्त्वाचं स्थान होतं. लक्ष्या मामांच्या निधनानंतर ते त्यांच्यासाठी खूप मोठा आधार होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाच्या 19 वर्षांनी आता काकांचं देखील निधन झाल्यानं स्वानंदी आणि संपूर्ण बेर्डे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
advertisement
हेही वाचा - 2023 मध्ये ते 3 महिने मराठी इंडस्ट्रीसाठी ठरले वाईट; 90च्या दशकातील दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप
दरम्यान रविंद्र बेर्डे हे गेली अनेक वर्ष घशाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर मुंबईच्या टाटा रूग्णालयात उपचार सुरू होते. अनेक वर्ष त्यांच्यावर उपचार घेत होते. दरम्यान काही दिवसांआधी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचं निधन झालं.
स्वानंदी आणि अभियन यांच्याबरोबर रविंद्र बेर्डे यांचं नातं फार घट्ट होतं. दोघांसाठी ते वडिलांसमान होते. दोघांचं ही आपल्या काकांवर जिवापाड प्रेम होतं. स्वानंदीनं नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काकांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात स्वानंदी आणि अभिनय यांनी रविंद्र बेर्डे यांना मिठी मारली आहे. रविंद्र बेर्डे यांनीही दोघआंचा हात घट्ट पकडला आहे. त्यांची तब्येत थोडी खालावल्यासारखी दिसत असून त्यांच्या नाकात देखील ट्यूब लावल्याचं दिसतंय. हा फोटो शेअर करत स्वानंदीनं ब्रोकन हार्ट इमोजी शेअर केला आहे.
रविंद्र बेर्डे यांनी 'चंगू मंगू', 'धमाल बाबल्या गणप्याची', 'एक गाडी बाकी अनाडी', 'खतरनाक', 'होऊन जाऊदे', 'हमाल दे धमाल', 'थरथराट', 'धडाकेबाज', 'गंमत जंमत', 'झपाटलेला' सारख्या दमदार सिनेमात काम केलं होतं.