1999 साली आलेल्या 'ताल' या सिनेमानं ऐश्वर्याचं करिअर घडवलं. ऐश्वर्याच्या आयुष्यातील 'ताल' हा अत्यंत महत्त्वाचा सिनेमा होता. सुभाष घई यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. ब्यूटी क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्याचा एक वेगळात अंदाज या सिनेमा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. आजही ताल मधील ऐश्वर्याचा अभिनय आणि तिची गाणी प्रेक्षकांना मोहिनी घालतात.
advertisement
हेही वाचा - 'उर्दू माझ्या शरिराचा एक भाग'; ट्रॅजेडी क्विनच्या घरी भाषा शिकले सचिन पिळगांवकर
फार कमी लोकांना माहिती असेल की ऐश्वर्यानं ताल सिनेमाचं संपूर्ण शुटींग हे विना मेकअप केलं होतं. आपल्या नैसर्गिक सौंदर्यानं ऐश्वर्यानं सगळ्यांना आपल्या प्रेमात पाडलं होतं. तिच्या नैसर्गिक सौंदर्यावर लाखो लोक फिदा झाले होते.
दिग्दर्शक सुभाष घई यांनी ताल या सिनेमातून ऐश्वर्याची मिस वर्ल्ड म्हणून असलेली इमेज ब्रेक केली होती. सुभाष घई नुकतेच इंडियन आइडलमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा त्यांना तालमध्ये ऐश्वर्यानं घेतलेल्या मेहनतीचं फार कौतुक केलं. तालमधील एका गाण्यामागचे BTS देखील सांगितले.
सुभाष घई म्हणाले, 'ताल सिनेमात जेव्हा मी ऐश्वर्याला कास्ट केलं तेव्हा मी पहिल्यांदा मी तिला हेच सांगितलं होतं की मला तुढी मिस वर्ल्ड वाली इमेज संपवायची आहे. कारण माझ्या सिनेमाच्या कथेतील मुलगी एक डिवाइन मुलगी होती. जी निसर्गात राहाणारी आहे. डोंगरावर, झाडांवर प्रेम करणारी आहे. तिच्या नैसर्गिक सौंदर्य दडलं आहे. तिला सुंदर दिसण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही'.
सुभाष घई पुढे म्हणाले, 'ताल से ताल मिला... हे सिनेमातील सुपरहिट गाणं आम्ही खऱ्या पाऊसात शुट केलं. गाणं शुट करताना मला समोर एक गवताचं पठार दिसलं. जिथे चिखल जमा झाला होता आणि चिखलात पाणी होतं. त्यानतंतर मी ऐशला विचारलं की, गाण्यात सावन ने भिगो दिया... अशा ओळी आहेत. त्यासाठी तू त्या चिखलात बसशील का? ऐशनं जराही वेळ न घेता त्या चिखलात उडी मारली'.
ताल से ताल मिला या गाण्यात ऐश्वर्याचा एक टॉप शॉट आहे ज्यात ती चिखलात झोपली आहे. या शॉटनंतर सुभाष घई यांनी ऐश्वर्याचं खुप कौतुक केलं होतं. इंडियन आयडिअलच्या मंचावर देखील हा किस्सा सांगताना सुभाष घई यांनी ऐश्वर्याला हॅट्स ऑफ ऐश्वर्या असं म्हटलं.