'उर्दू माझ्या शरिराचा एक भाग'; ट्रॅजेडी क्विनच्या घरी भाषा शिकले सचिन पिळगांवकर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सचिन पिळगावकर यांनी हिंदी सिनेमात बालकलाकार म्हणून काम करायला सुरूवात केली. ऋषीकेश मुखर्जी यांच्या मजली दीदी या सिनेमात सचिन पिळगावकर यांनी काम केलं.
मुंबई, 19 डिसेंबर : अभिनेते सचिन पिळगावकर गेली अनेक दशकं सिनेसृष्टीत काम करत आहे. बालकलाकार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज 50 वर्ष अविरतपणे सुरू आहे. सचिन पिळगावकर हे मल्टिटॅलेंडेट व्यक्तिमत्त्व आहे हे सर्वांना माहिती. अभिनयाबरोबरच ते उत्तर गायक आहे. उत्तर शायरी त्यांना येते. ते उत्तम डान्सरही आहेत. त्यांच्या बोलण्यात कायम मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेचा प्रभाव असल्याचं दिसतं. मराठीबरोबरच त्यांना उत्तम उर्दू भाषा देखील येते. त्यांचं शिक्षण संपूर्ण मराठी भाषेत झालं असलं तरी उर्दू भाषेवर देखील त्यांचं वर्चस्व असल्याचं दिसतं. नुकत्याच एका मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी उर्दू माझ्या शरिराचा एका भाग असल्याचं सांगितलं. त्यांच्या उर्दू शिकवणीची एक आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली.
रूपेरी पडदा गाजवणारे अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर नुकतेच मिरास-फेस्टिव्हल ऑफ हिंदुस्तानी कल्चर अँड लिटरेचर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी त्यांचं उर्दू भाषेवरील प्रेम आणि उर्दू भाषा शिकण्याचा प्रवास सांगितला. सचिन पिळगावकर यांच्या उत्तर उर्दू भाषेसाठी बॉलिवूडची प्रसिद्ध ट्रॅजिटी क्विननं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
advertisement
सचिन पिळगावकर यांनी हिंदी सिनेमात बालकलाकार म्हणून काम करायला सुरूवात केली. ऋषीकेश मुखर्जी यांच्या मजली दीदी या सिनेमात सचिन पिळगावकर यांनी काम केलं. या सिनेमात ट्रॅजिडी क्विन मीना कुमारी मजली दीदीची प्रमुख भूमिका साकारत होते. सिनेमाच्या शुटींगवेळी सचिन पिळगावकर आणि मीना कुमारी यांची भेट झाली. मीना कुमारीला सचिन यांचा अभिनय आवडला.
advertisement
एकेदिवशी मीना कुमारी यांनी सचिन यांना बोलावून तू घरी कोणती भाषा बोलतोस असं विचारलं. त्यावर सचिन यांनी मराठी बोलतो असं सांगितलं. मग तू हिंदी कधी बोलतोस असा प्रश्न मीना कुमारींनी विचारला. तेव्हा सचिन म्हणाले फक्त सेटवर आल्यावर हिंदी बोलतो.
advertisement
या प्रसंगानंतर मीना कुमारी यांनी सचिन पिळगावकर यांच्या आई-वडिलांना सेटवर बोलावलं आणि तुमचा मुलगा खूप चांगला अभिनेता आहे. पण त्याच्या हिंदीमध्ये मराठीचा लहेजा आहे. त्याला उर्दू बोलता येणं गरजेचं आहे. त्याला माझ्याकडे पाठवा.
मीना कुमारी यांच्याकडे सचिन पिळगावकर फार लहान असताना उर्दू भाषा शिकण्यासाठी जात असत. आठवड्यातून चार दिवस ते मीना कुमारींच्या घरी जात. घरी गेल्यानंतर आधी ते टेबल टेनिस खेळत त्यानंतर एक तास उर्दूची शिकवणी होत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 19, 2023 9:18 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'उर्दू माझ्या शरिराचा एक भाग'; ट्रॅजेडी क्विनच्या घरी भाषा शिकले सचिन पिळगांवकर