सिनेमातून काढून टाकायचे, इंडस्ट्री सोडली अन् अभिनेत्री आज 650 कोटींची मालकीण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
या अभिनेत्रीचा फारसा परिचय करून देण्याची गरज नाही. कारण तिनं तिच्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
मुंबई, 19 डिसेंबर : हल्ली बॉलिवूड इंडस्ट्रीत येणाऱ्या प्रत्येकाच्या कलाकाराचं कोणी नातेवाईक किंवा आई-वडील इंडस्ट्रीशी जोडलेले असतात. पण असे फार कमी कलाकार आहेत ज्यांचं या इंडस्ट्रीत कोणी नाही. पण तरीही त्यांनी स्वत:च्या जीवावर इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं आहे. त्यांची ख्याती देशा-विदेशात आहे. आपण आज अशा एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत की जी भारतीय अभिनेत्री पण तिची ख्याती आज हॉलिवूडमध्येही आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तिला निर्माते सिनेमातून काढून टाकायचे. पण आज ती हॉलिवूडचीही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नाव कमावतेय.
या अभिनेत्रीचा खरंतर परिचय करून देण्याची गरज नाही. कारण तिनं तिच्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. 2000 साली तिनं मिस वर्ल्डचा किताब देखील स्वत:च्या नावे केला आहे. पण आज हॉलिवूडपर्यंत जाण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता.
हेही वाचा - सारा, जान्हवी ते आराध्या सगळ्या स्टारकिड्सचं याच शाळेत झालं शिक्षण; किती लाख आहे एका वर्षाची फी?
advertisement
या अभिनेत्रीनं तिच्या स्ट्रगल काळात अनेक कठीण गोष्टींचा सामना केला आहे. दिग्दर्शक तिच्यावर ओरडायचे. अनेकदा तिला सेटवरून हकलून द्यायचे. पण तिनं कधीच हार मानली नाही. ती कधी खचली नाही. चुका करत करत ती शिकली आणि आज ती अनेक अभिनेत्री आणि स्त्रियांसाठी इन्स्पिरेशन आहे. ती अभिनेत्री म्हणजेच देसी गर्ल प्रियांका चोप्रा.
advertisement
प्रियांकानं बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. वोग इंडियाशी बोलताना प्रियांकानं सांगितलं होतं की, 'मला किंवा कोणालाच काहीच माहिती नव्हतं. दिग्दर्शक माझ्यावर ओरडला. मला सिनेमातून काढून टाकलं. इथे तुम्ही जितकं जास्त बोलता तितकं कमी ऐकता आणि कमी शिकता'. प्रियांका पुढे म्हणाली, 'या कठीण काळात मी माझा आत्मविश्वास वाढवला. अपयशानंतर तुम्ही जे शिकता तेव्हा तुम्हाला यश मिळतं हे मी शिकले'.
advertisement
हेही वाचा - ऐश्वर्या अभिषेक मधील दुराव्याला सासूबाईच जबाबदार? 'या' कारणामुळं ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आल्या जया बच्चन
Jio Mamai मुंबई फिल्म फेस्टिवल 2023मध्ये प्रियांका चोप्रा सहभागी झाली होती. मास्टर क्लासच्या सेशनमध्ये प्रियांकानं सांगितलं होतं की, 'एका अभिनेत्यानं सीन आणि सिनेमावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला होता. पण तिनं अशा गुंडगिरीच्या वागणूकीला समर्थन केलं नाही किंवा त्यात ती फार गुंतली नाही'.
advertisement
advertisement
'माझ्यासोबत हे घडलं शूटिंग थांबवण्यात आलं.तो एक monologuहोता. मी त्या व्यक्तीचे नाव सांगणार नाही, जर तुम्हाला अंदाज आला असेल तर.. तो माझ्याबद्दल बोलत असलेला अभिनेत्याचा monologu होता. मला कसे वाटते?' पण त्याने माझ्याकडे पाहिलंही नाही. मला त्यांच्या लाईनमध्ये सामील व्हायचं होतं, पण जमलं नाही. म्हणून, शेवटी मी निर्मात्याकडे गेले आणि त्याला म्हणालो, 'मी ज्या अभिनेत्यासोबत काम करत आहे त्याची मी प्रशंसा करतो, परंतु हे माझ्यासाठी खरोखर कठीण आहे. मी माझ्या ओळी कशा बोलते हे ऐकण्यासाठी मला माझ्या सहकलाकाराची गरज आहे, असंही प्रियांकानं सांगितलं.
advertisement
प्रियांकाला अमेरिकेच्या शाळेतही त्रास दिला जायचा असं तिनं सांगितलं होतं. प्रियांकानं निक जोनसबरोबर लग्न केलं. प्रियांका आता 650 कोटी संपत्तीची मालक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 19, 2023 8:12 AM IST