TRENDING:

कोण होती आलिया भट्टने साकारलेली रिअल 'राझी'? पाकिस्तानात राहून करत होती भारतासाठी हेरगिरी

Last Updated:

Who is Raazi Alia Bhatt Calling Sehmat : भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर हल्ला करून 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या निमित्तानं पाकिस्तान राहून भारतासाठी हेरगिरी करणाऱ्या 'राझी'ची पुन्हा आठवण झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्टने साकारलेली ही रिअल राझी कोण होती?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जम्मू -काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिलं आहे. 7 मे च्या मध्यरात्री भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवर हल्ला केला ज्यात 9 दहशतवाद्यांवर खात्मा करण्यात आला. रात्री दीड वाजता हा हल्ला करण्यात आला ज्यात पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं काश्मीरमधील पीओके दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आलं.
News18
News18
advertisement

ऑपरेशन सिंदूर राबवण्याची सुरुवातीची जबाबदारी एनएसए प्रमुख अजित डोभाल यांनी घेतली. डोभाल यांनी एका विशेष पथकासह या ऑपरेशनची जबाबदारी स्वीकारली आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील अनेकदा भारताने पाकिस्तानला बेचीराख केलं आहे. या हल्ल्यानंतर भारतीय राझीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अभिनेत्री आलिया भट्टने साकारलेली गुप्तहेर सेहमत ही भारतीय मुलगी जिनं 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी पाकिस्तानात जाऊन भारतासाठी हेरगिरी केली. कोण होती भारतीय सेहमत जिच्यापुढ्यात पाकिस्तानलाही गुघडे टेकवावे लागले. आलिया भट्टने साकारलेली त्या मुलीची खरी कहाणी पाहूयात.

advertisement

( देश साखर झोपेत, भारताचा पाकवर Air Strike; रितेश देशमुखचं 3 वाजून 2 मिनिटांनी ट्विट )

'राझी' हा चित्रपट 'कॉलिंग सेहमत' या कादंबरीवर आधारित आहे. ही कांदबरी माजी नौदल अधिकारी हरिंदर सिक्का यांनी लिहिली होती. ही कादंबरी एका भारतीय काश्मिरी मुलीवर आधारित आहे. ही कहाणी 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळातील आहे. त्या वेळी भारतीय लष्कराला पाकिस्तानातील हालचाली समजून घेण्यासाठी एका गुप्तहेराची गरज होती.

advertisement

काश्मीरमधील एका व्यावसायिकाने त्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला, सेहमतला देशासाठी गुप्तहेर बनण्यास राजी केले. विशेष म्हणजे सेहमत ही व्यावसायिक गुप्तहेर नव्हती ती एक सामान्य मुलगी होती पण देशासाठी काहीही करायला तयार होती.

सेहमतचे लग्न पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सेहमतचे लग्न एका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लावण्यात आले. लग्नानंतर ती पाकिस्तानात आपल्या सासरी गेली. तिथे राहून तिने भारताला अत्यंत गोपनीय माहिती दिली.

advertisement

हरिंदर सिक्का लिखित 'Calling Sehmat' या पुस्तकानुसार सेहमतने दिलेल्या माहितीतून भारताने अनेक मोठ्या संकटांपासून स्वतःचा बचाव केला.

दोन वर्षे पाकिस्तानात, परतली तेव्हा होती गरोदर

सेहमत त्या काळात 2 वर्षे पाकिस्तानात आपल्या सासरच्यांमध्ये राहिली. या काळात तिने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या गुप्त माहितीचा पुरवठा केला. युद्ध जवळ येत असताना ती भारतात परतली तेव्हा ती गरोदर होती. नंतर तिने एका मुलाला जन्म दिला जो पुढे भारतीय लष्करात अधिकारी झाला.

advertisement

लेखक हरिंदर सिक्का यांना कशी मिळाली सेहमतची कहाणी?

कारगिल युद्धाबाबत संशोधन करताना हरिंदर सिक्का यांची भेट सेहमतच्या मुलाशी झाली. त्या वेळी त्याला आपल्या आईच्या साहसाची माहिती मिळाली. त्यानंतर सिक्का यांनी ‘Calling Sehmat’ हे पुस्तक लिहिले.

हरिंदर सिक्का यांनी सांगितले की, सेहमतने भारताच्या गुप्तचर यंत्रणेला दिलेल्या सर्व माहितीची पडताळणी केली गेली आणि ती पूर्णपणे खरी ठरली. मला हे पुस्तक लिहिण्यास 8 वर्षे लागली.

सेहमतला केवळ संपर्क साधण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. पण तिने त्याही पलीकडे जाऊन गोपनीय कागदपत्रे, हालचालींची माहिती मिळवून भारताला दिली.

सिक्का म्हणतात की, जर Calling Sehmat हे पुस्तक लिहिण्यात आलं नसतं तर सेहमतची कहाणीही इतर अनेक गुप्तहेरांप्रमाणे कधीच समोर आली नसती. एक सामान्य मुलगी जी प्रेमाने नव्हे तर देशभक्तीच्या प्रेरणेने शत्रू देशात जाऊन राहिली. ही कहाणी आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायक ठरते.

मराठी बातम्या/मनोरंजन/
कोण होती आलिया भट्टने साकारलेली रिअल 'राझी'? पाकिस्तानात राहून करत होती भारतासाठी हेरगिरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल