देश साखर झोपेत, भारताचा पाकवर Air Strike; रितेश देशमुखचं 3 वाजून 2 मिनिटांनी ट्विट

Last Updated:

Operation Sindoor Celebs Reaction : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानच्या पीओकेमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केला. पहलगाम हल्ल्यानंतर 15 दिवसांनी झालेल्या एअर स्ट्राईकवर अनेक कलाकारांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिल्या.

News18
News18
मुंबई : संपूर्ण देश साखर झोपेत असताना भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करत क्रूर दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 15 दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं काश्मीरमधील पीओके दहशतवादी तळ उद्धवस्त केलं. भारतीय सैन्याच्या या कामगिरीनंतर प्रत्येक भारतीय नागरिकाचा उर अभिमानानं भरून आला आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताच्या या कामगिरीवर अनेक कलाकारांनी ट्विट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख याने रात्री 3 वाजून 2 मिनिटांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रितेशचं ट्विट चर्चेत आलं आहे. रितेशनं ट्विट करत लिहिलंय, जय हिंद की सेना... भारत माता की जय... ऑपरेशन सिंदूर.
advertisement
रितेशसह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री देओलिना हिनं लिहिलंय, धर्म विचारून गोळ्या मारल्या. भारताच्या आत्म्यावर हल्ला केला. आता मातीत जाल. जय हिंद. जय भारत. जय हिंद की सेना. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून स्ट्राईक केला.
advertisement
निर्माते मधुर भांडारकर यांनीही ट्विट करत लिहिलंय, आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र, आम्ही एकत्र उभे आहोत. जय हिंद, वंदे मातरम.
advertisement
advertisement
advertisement
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला. ज्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. हे लोक भारतातील विविध भागातून पर्यटनासाठी आले होते. आतंकवाद्यांनी त्यांना धर्म विचारून गोळ्या मारल्या. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.
मराठी बातम्या/मनोरंजन/
देश साखर झोपेत, भारताचा पाकवर Air Strike; रितेश देशमुखचं 3 वाजून 2 मिनिटांनी ट्विट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement