एखाद्या कलाकाराबरोबर बोल्ड सीन्स करणं काही सोप नसतं. अभिनेत्रींसाठी तर ते अनेकदा मुश्किल होऊन बसतं. एकदा एखादा बोल्ड सीन केला तर एक शिक्का कलाकारांवर बसतो. अभिनेत्री तृप्ती डिमरीनं अॅनिमल सिनेमात केलेल्या सेक्स सीनची खूप चर्चा होतेय. एका सेक्स सीनमुळे तृप्ती डिमरी कमालीची फेमस झाली पण तिच्यावर तितकीच टीका देखील केली जाते. तिचे आई वडील देखील तिच्या या सीनवर नाराज असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
हेही वाचा - चुकूनही फॅमिलीबरोबर OTTवर पाहून नका 'या' 10 फिल्म्स! नुसत्या बोल्ड नाही तर आहेत महाबोल्ड
बोल्ड सीन किंवा सेक्स सीन करण्यासाठी कलाकार सर्वाधिक मानधन आकारतात असं ऐकीवात आहे. कलाकार प्रत्येक सीन नुसार मानधन घेतात असंही म्हटलं जातं. 70-90च्या दशकातील अनेक सिनेमांमध्ये बोल्ड सीन्स पाहायला मिळतात. अभिनेता इमरान हाशमी तर मोठ्या पडद्यावरील रोमान्सचा बादशहा आहे असं देखील म्हटलं जातं. एक बोल्ड सीन करण्यासाठी हे कलाकार नेमके किती पैसे घेत असतील ?
talentrack.in वरील माहितीनुसार, एक अभिनेत्री एखाद्या OTT प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन देत असेल तर एका एपिसोडसाठी तिला 2-2.5 लाख रूपये मिळतात. यात बोल्ड आणि इंटिमेट सीन्स असतात. जर तुम्हाला बोल्ड सीन करण्यात कम्फर्ट वाटत असेल तरच करा असं आधीच टीमकडून सांगण्यात येत.
त्याचप्रमाणे OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या बोल्ड वेब सीरिजसाठी एखाद्या अभिनेत्याला पर एपिसोडसाठी 2-2.5 लाख रूपये मानधन दिलं जातं. जर कलाकार फार प्रसिद्ध असतील तर हे मानधन वाढतं. अभिनेता इमरान हाशमी त्याच्या एका सिनेमासाठी 10 कोटी रूपये मानधन घेतो.