TRENDING:

Jahnavi Killekar : स्वतःवर कंट्रोल ठेव, जान्हवीला नवऱ्याने दिला मोलाचा सल्ला; पाहा नेमका काय म्हणाला?

Last Updated:

सर्व स्पर्धकांप्रमाणे जान्हवी किल्लेकरच्या घरातील लोकांनी तिला सरप्राईज दिलं. यावेळी तिचा नवरा आणि मुलगा घरात तिला भेटायला आले. यावेळी जान्हवीच्या नवऱ्याने तिला समजवलं आणि स्वतःवर कंट्रोल ठेवायला सांगितला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' च्या घरात सध्या भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. कारण फॅमिली वीक सुरू आहे. घरातील लोक स्पर्धकांना भेटायला आल्यामुळे त्यांना पाहून स्पर्धकांना रडू कोसळलं आहे. सोबतच घरातील लोक स्पर्धकांना महत्त्वाचे सल्लेही देताना दिसत आहे. सर्व स्पर्धकांप्रमाणे जान्हवी किल्लेकरच्या घरातील लोकांनी तिला सरप्राईज दिलं. यावेळी तिचा नवरा आणि मुलगा घरात तिला भेटायला आले. यावेळी जान्हवीच्या नवऱ्याने तिला समजवलं आणि स्वतःवर कंट्रोल ठेवायला सांगितला.
जान्हवीला नवऱ्याने दिला मोलाचा सल्ला
जान्हवीला नवऱ्याने दिला मोलाचा सल्ला
advertisement

समोर आलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये दिसतंय की, जान्हवी किल्लेकरला तिचा नवरा नॉमिनेशनवरून समजवत आहे. जान्हवीचा नवरा किरण तिला म्हणाला, "तू नॉमिनेशनला घाबरू नकोस ना, तू व्यवस्थित चाललीयेस फक्त स्वतःवर कंट्रोल ठेव. तुला वाटतंय तू नॉमिनेशनमध्ये आली म्हणून तू वीक आहेस. तू वीक नाहीयेस." त्यावर जान्हवी म्हणते "मला बाहेर पडण्याची भीती आहे. मी पहिल्यांदाच नॉमिनेशनमध्ये आली त्यामुळे मला भीती वाटत आहे."

advertisement

Suraj chavan Family: आत्या आणि बहिणींना पाहून गोलीगत सूरज भावूक, मिठी मारताच कोसळलं रडू!

जान्हवी पुढे म्हणते, "मी एक तर आधीच मॅटर केले आहेत त्यामुळे मला भीती आहे." मग यावर किरण म्हणतो, "तू मॅटर केले तुला जेल झाली. बाहेर आल्यावर तुला समजलं तुझी चूक झाली. परत तळ्यात मळ्यात करू नकोस ठाम राहा." मग जान्हवी बोलते "मी ठामच आहे."

advertisement

दरम्यान, 'बिग बॉस मराठी 5' च्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. घरातील स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंब, जवळचे लोक येत आहेत. त्यामुळे घरात सध्या खूप भावनिक वातावरण झालंय. घरच्यांना पाहून स्पर्धकांना अश्रू अनावर झाले आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Jahnavi Killekar : स्वतःवर कंट्रोल ठेव, जान्हवीला नवऱ्याने दिला मोलाचा सल्ला; पाहा नेमका काय म्हणाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल