TRENDING:

Dhurandhar: भल्याभल्या गायकांची बोबडी वळली, तिथे मराठमोळ्या अभिनेत्रीने गायलं FA9LA गाणं, VIDEO पाहून होश उडतील!

Last Updated:

Dhurandhar FA9LA Song: सध्या सर्वत्र FA9LA या गाण्याची चर्चा रंगली आहे. FA9LAगाणं व्हायरल तर होत आहे. पण हे गाणं वाटतं तितकं सोपं नाहीय. हे गाणं गाताना अनेकांची बोबडी वळतेय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या 'धुरंधर'ची चर्चा असली, तरी सोशल मीडिया आणि युट्यूबवर अक्षय खन्नाच्या 'FA9LA' गाण्याचा एक वेगळाच 'फिव्हर' सुरू आहे. चित्रपटातील अक्षयच्या जबरदस्त एन्ट्रीला वाजणारं हे गाणं आणि त्यावर अक्षयचा स्वॅग चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वत्र याच गाण्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर तब्बल 2.7 मिलियन रील्स बनवल्या गेल्या आहेत.
News18
News18
advertisement

पण, हे गाणे ऐकायला आणि पाहायला जितके सोपे आहे, तितकं गायला सोपं नाही. म्हणूनच कदाचित अद्याप कोणीही या गाण्याचं कव्हर व्हर्जन बनवण्याचं धाडस केलेलं नाही. हे गाणं गाण्याचा प्रयत्न करताना भल्याभल्या गायकांची बोबडी वळतेय. अशातच, मराठमोळी अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची मुलगी आणि अभिनेत्री-गायिका सई गोडबोले हिने हे आव्हान स्वीकारले आणि तिचं हे गाणं गातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

advertisement

FA9LA गाणारी एकमेव!

सईने नुकताच इन्स्टाग्रामवर 'FA9LA' हे गाणे गातानाचा व्हिडिओ शेअर केला. तिचं गाणं आणि आवाजातील स्पष्टता पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले. 'हे गाणे इतक्या सफाईदारपणे गाणारी ती एकमेव आहे,' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

Dhurandhar Akshaye Khanna: अक्षय खन्नाला ऑस्कर! धुरंधरचा 'तो' सीन पाहून भाजप नेत्याची थेट मागणी, पाहा काय म्हणाले?

advertisement

सई गोडबोले केवळ उत्कृष्ट गायिकाच नाही, तर तिची भाषिक पकड आणि ॲक्सेंट जबरदस्त आहे. सईला नवीन भाषा किंवा बोलण्याची पद्धत आत्मसात करण्याची कला चांगलीच जमते. सईचा एक मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यात तिने १० वेगवेगळ्या ॲक्सेंटमध्ये संवाद साधला होता. 'फ्रोजन'मधील बेबी अन्ना, रचेल ग्रीन, शकीरा, ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश आणि फ्रेंच यांसारख्या ॲक्सेंटमध्ये तिचे बोलणे ऐकून नेटकरी थक्क झाले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा मोठी वाढ, कांदा आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

'धुरंधर' चित्रपटाने जसा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे, तसाच 'FA9LA' गाण्याने इंटरनेटवर गाजवले आहे. सोशल मीडिया क्वीन असलेल्या सई गोडबोलेने हे कठीण गाणं गाण्याचे आव्हान स्वीकारून पुन्हा एकदा तिच्या मल्टीटॅलेंटेड व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवून दिली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar: भल्याभल्या गायकांची बोबडी वळली, तिथे मराठमोळ्या अभिनेत्रीने गायलं FA9LA गाणं, VIDEO पाहून होश उडतील!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल