धनंजय पोवार बिग बॉस मराठी 5 च्या टॉप 4 मध्ये होता. चौथ्या नंबरवर असताना तो एलिमिनेट झाला. थोडक्यात ट्रॉफी हुकली. त्यामुळे DP दादाचे चाहते नाराज झाले. ट्रॉफी हुकली मात्र चाहत्यांनी दिलेलं प्रेम पाहून DP दादा भावूक झाला. व्हिडिओ शेअर करत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यायला तयार नव्हता, जत्रेत नाचत असतानाच उचलला; बिग बॉसच्या घरात असा आला सूरज चव्हाण
advertisement
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत धनंजय पोवारने म्हटलं, "नमस्कार मी धनंजय पोवार तुमच्या सर्वांचा लाडका. बिग बॉस मराठी सीझनमध्ये चौथ्या क्रमांकावर जे काही प्रयत्न करून तुम्ही ठेवलंय ना, मी कसे तुमचं आभार मानावे कळत नाही. मी इमॅजिन केलं नव्हतं की तुम्ही मला इतकं प्रेम मिळेल. मी जो होतो तसा होतो तसा दाखवला गेलो. हा व्हिडिओ आभार मानण्यासाठी आहे. ज्या लोकांनी मला वोट करण्यासाठी प्रयत्न घेतले, वोट केले, जेवण दिलं, पैसे खर्च केले. मला आता हळूहळू कळतंय कोणी कोणी माझ्यासाठी काय केलं. तुमचं माझ्यावरचं प्रेम पाहून मन भरून येतंय. माझ्या डोळ्यात पाणी येतंय."
धनंजयने पुढे म्हटलं, "काय म्हणावं या प्रेमाला, मला ट्रॉफी नाही मिळाली याची खंत आहे, त्यामुळे तुमचा थोडा हिरमूड झाला असेल. मात्र तुमच्या प्रेमामुळे माझी किंमत तुम्ही वाढवली. बिग बॉसचा प्रवास छान वाटला. मी कोणती चूक केली नाही. आय लव्ह यू महाराष्ट्र."