मुनावर फारुकी यांनी सुनीताला शोमध्ये नाचण्यासाठी बोलावतो आणि दोघे बीबी नंबर वन या गाण्यावर नाचतात. तेव्हा सुनीता म्हणाली, "मी तुझी बीबी नंबर 1 नाहीये की तू माझ्यासोबत असा नाचत आहेस. मी तर गोविंदाची बीबी नंबर 1 आहे." तेवढ्यात कोणीतरी तिला बोलतं, मॅम तुमच्यासोबत राहून गोविंदा सरही टू जी झालेत. त्यावर सुनिता म्हणते, घरवालीच्या समोर सगळेच टू जी असतात. बाहेरवालीसोबत सगळे जेन झी होऊन जातात.
advertisement
( Guess Who: निरागस चेहरा, उदार हृदय, हिट सिनेमांची क्वीन आहे ही अभिनेत्री! तुम्ही ओळखलंत का? )
एवढेच नाही तर तिने गोविंदाच्या अफेअर आणि फ्लर्टिंगबद्दल बोलून सर्वांना आश्चर्यचकित केलं. सुनीता म्हणाली, "गोविंदा जवळजवळ प्रत्येक अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करायचा पण सोनाली बेंद्रे ही एकमेव अभिनेत्री होती जिच्यासोबत त्याने कधीही फ्लर्ट केलं नाही."
सुनीता आहुजाच्या या खुलाशाने शोमधील स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. यादरम्यान सोनाली बेंद्रे स्टेजवर लाजताना दिसली. सुनीता आणि सोनालीमध्ये डान्स स्पर्धा देखील झाली. दोघी गोविंदाच्या 'मैं तो रास्ते से जा रहा था' या सुपरहिट गाण्यावर नाचल्या.
यानंतर ईशा मालवीयाने 'मॅरेज रिपोर्ट कार्ड' राऊंड दरम्यान सुनीता आहुजाला तिचा पती गोविंदाला रेटिंग देण्यास सांगितले. सुनीता यांनी गोविंदाच्या विसरण्याच्या सवयी आणि जबाबदारीसाठी 10 पैकी 7 गुण दिले. सुनीता यांनी गोविंदाच्या निष्ठेलाही रेटिंग दिले. या प्रकरणात तिने गोविंदाला 6 गुण दिले. सुनीता यांच्या या रेटिंगवर प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.
सुनीता आहुजा यांनीही शोमध्ये सामील होण्याचा तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, "पती पत्नी और पंगा या मालिकेचा भाग होणे खूप छान होतं. ती एक सुंदर आठवण होती. त्यात जुन्या आठवणी आणि विनोद होते. मला पुन्हा गोविंदाच्या गाण्यांवर नाचणे, सोनालीसोबत स्टेज शेअर करणे खूप आवडले. सोनालीसोबत घालवलेला वेळ खास होता. आम्ही हसलो आणि जुने मजेदार क्षण आठवले."