टेलिव्हिजनवर आजवर अनेक खलनायिका पाहायला मिळाल्या आहेत. पण अवघ्या विसाव्या वर्षी या अभिनेत्रीनं खलनायिका बनून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकलीने दहा वर्षांआधी झी मराठीवरी एक मालिका केली होती. आता ती मोठी झाली असून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
( Onkar Bhojane : ओंकार भोजनेची घरवापसी! 'कोकण कोहिनूर' पुन्हा हास्यजत्रेत, शूटींगला सुरुवात )
advertisement
फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून कमळी मालिकेतील अनिका आहे. अभिनेत्री केतकी कुलकर्णी असं तिचं नाव आहे. तिची मालिकेतील भूमिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या भूमिकेतील तिचा अभिनय आणि अस्तित्व प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवत आहे.
कमळी या यशस्वी शोच्या माध्यमातून, केतकी आपल्या अभिनय क्षेत्रातील दहाव्या वर्षात पुन्हा एकदा झी मराठीवर झळकत आहे, हे एक विलक्षण योगायोग ठरतोय. केतकीच्या अभिनय प्रवासाची सुरुवात 10 वर्षांपूर्वी झी मराठीवरील "अस्मिता" या गाजलेल्या मालिकेतून झाली होती. पूजा ही भूमिका करताना केतकी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली होती.
केतकी म्हणाली, "मी तीन वर्षांची असल्यापासून टीव्हीवर स्वतःला पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि झी मराठीमुळे ते पूर्ण झालं. तेव्हापासून आजवर मी 12 महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये अभिनय केला आहे. झी मराठी हे माझ्या करिअरचं पहिलं व्यासपीठ ठरलं आणि झी स्टुडिओज अंतर्गत माझा पहिला चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यामुळे झी ही संस्था केवळ एक चॅनल न राहता माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. लहानपणापासून झी मराठीवरील कार्यक्रम पाहत आली आहे , आज त्या परिवाराचा भाग आहे, ही भावना माझ्यासाठी अतिशय खास आहे."
केतकी पुढे म्हणाली, "या 10 वर्षांत मी अनेक चढ-उतार अनुभवले. संघर्ष, नकार, संधींची प्रतीक्षा हे सगळं शिकताना, मी कायम पाय जमिनीवर ठेवले. या क्षेत्रात वेळच सर्व खेळ आहे, वाट पाहायची, देवावर विश्वास ठेवायचा, मेहनत करायची की यश नक्की मिळतं."