करण जौहरने आपल्या नावाचा डंका पुन्हा एकदा वाजवला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या 100 सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत त्यांनी 96 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांना मागे टाकले आहे.
100 सर्वात शक्तिशाली भारतीयांमध्ये कोणकोणते बॉलिवूड सेलेब्स?
शाहरुख खान यंदा 97 व्या क्रमांकावर आहे. 2024 मध्ये त्याची कोणतीही फिल्म रिलीज झाली नाही, तरी तो अजूनही टॉप सेलिब्रिटींमध्ये सामील आहेत. त्याची स्टार पॉवर अद्याप कायम आहे आणि त्याच्या संपत्तीत वाढच होत आहे. शाहरुख खानची प्रॉपर्टी 7,300 कोटी रुपये झाली आहे. 2026 मध्ये येणार असलेल्या 'किंग' सिनेमाची शूटिंग त्यांनी सुरू केली आहे.
advertisement
यादीतील एकमेव सिंगर दिलजीत दोसांझ हा 98 व्या स्थानावर आहे. दिलजीतने कोचेला फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केले आहे आणि 'द टुनाईट शो विथ जिमी फॅलन' मध्ये सामील होणारा पहिला पंजाबी आर्टिस्ट ठरला आहे. त्याच्या पगडी आणि पारंपरिक पोशाखाने त्याने सामाजिक रूढींना तोडले आहे. त्याने 'पंजाब 95' या सिनेमात काम केले आहे जो जसवंत सिंह खैरा यांच्या जीवनावर आधारित आहे.
Actress Life Ruined: राजघराण्याची मुलगी, डेब्यू करताच बनली स्टार, एका MMS मुळे रातोरात करिअर बरबाद
अमिताभ बच्चन 99 व्या स्थानावर असून त्यांनी 50 वर्षांपासून भारतीय सिनेमा गाजवला आहे. ते आजही 'कौन बनेगा करोडपती' चे होस्ट आहेत. त्यांनी 'काली 2896 एडी' मध्ये दमदार परफॉर्मन्स दिला आहे. त्यांनी यंदा 120 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
आलिया भट्ट या 100 व्या स्थानावर आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमातून तिने इंटरनॅशनल डेब्यू केलं आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'गंगूबाई काठियावाड़ी' यांसारख्या सिनेमांमधून तिने आपले स्थान पक्के केले आहे. यशराज फिल्म्सची 'अल्फा' आणि 'लव्ह अँड वॉर' हे त्यांचे आगामी प्रोजेक्ट्स आहेत. तिने फूल.को मध्ये केलेल्या गुंतवणुकीत 130 टक्क्यांनी वाढ झाली आहे.