परिणीतीच्या प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर तिचा पहिला पब्लिक लूक समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘डिंकी निरह’ या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये परिणीती काळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसली. साधा पण आकर्षक लूक दिसला. सर्वात खास गोष्ट म्हणजे तिचा गोंडस बेबी बंप.
रेखा 'या' पाकिस्तानी क्रिकेटरसोबत करणार होती लग्न, मग काय बिनसलं?
advertisement
परिणीती आणि राघवचं नातं बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक मानलं जातं. दोघेही आधी मित्र होते आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मे 2023 मध्ये त्यांनी दिल्लीत कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये उदयपूरमध्ये शाही थाटात विवाह सोहळा पार पडला.
25 ऑगस्ट 2025 रोजी दोघांनी इंस्टाग्रामवर गोडसर पद्धतीने आपलं प्रेग्नन्सी न्यूज शेअर केली होती. "1+1=3” लिहिलेल्या केकसोबत हातात हात घालून चालतानाचा एक व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला होता. त्यावर बॉलिवूड स्टार्सपासून ते राजकीय क्षेत्रातील लोकांनीही शुभेच्छा दिल्या होत्या.