रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ, लाइफ अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता रिंकूचा नवा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
रिंकू राजगुरूची एकूण संपत्ती किती? एका सिनेमासाठी घेते एवढे मानधन?
रिंकूने इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ शेअर केलाय. याची खास गोष्ट म्हणजे तिने तिचा पहिला सिनेमा सैराटमधील गाण्यावर हा डान्स व्हिडीओ बनवला आहे. 'सैराट झालं जी...' या सर्वात गाजलेल्या गाण्यावर तिने हा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, "पहिलं ते पहिलच असत…सैराट झालं जी…!"
advertisement
रिंकूने हा व्हिडीओ शेअर करताच व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळत आहे. अनेकांनी रिंकूच्या डान्सचं कौतुक केलं. एकदम झकास रिंकू ताई. मस्तच, खूप सुंदर, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहे.
दरम्यान, 'सैराट' (2016) हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याने इतिहास रचला. हा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. रिंकूने साकारलेली 'आर्ची' आणि आकाश ठोसरने साकारलेला 'परश्या' या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या. एका ग्रामीण भागातील, धाडसी आणि प्रेमळ 'आर्ची'ने प्रेक्षकांना वेड लावले. तिची बिनधास्त बाईक चालवण्याची स्टाईल, तिचा आत्मविश्वास आणि तिने व्यक्त केलेल्या तीव्र भावनांनी सर्वांनाच आकर्षित केले.
सैराटनंतर रिंकूने 'सैराट'च्या हिंदी रिमेक 'धडक' (Dhadak) मध्ये तिने कॅमिओ केला. याशिवाय, तिने 'झुंड' (Jhund) या अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या हिंदी चित्रपटात काम केले. तिने 'हंड्रेड' (Hundred) या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. 'कागर', 'मेकअप', अशा अनेक सिनेमांमध्ये तिने अभिनयाची छाप सोडली.