या फोटोने चाहत्यांची उत्सुकता ताणली आणि अनेकांनी तर्क लावायला सुरुवात केली. ही छोटी चिमुकली मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेत्री आहे. पदार्पणातच तिनं 100 कोटींचा सिनेमा केला होता. तिचं नाव फेमस खासदाराच्या मुलाशी जोडण्यात आलं होतं. तुम्ही ओळखलं का या चिमुकलीला?
( 'एक वेळ अशी होती की...', विराट कोहलीसोबत अॅड शूट, श्रृती मराठेनं शेअर केला सेटवरचा अनुभव )
advertisement
या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली मुलगी ही सैराटमधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आहे. 2016 मध्ये आलेल्या या सिनेमाने रिंकूला एका रात्रीत स्टार बनवलं. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमात रिंकूने साकारलेली आर्ची प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. ऑनर किलिंगसारख्या गंभीर विषयावर आधारित या सिनेमाने तब्बल 104 कोटींची कमाई केली आणि मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला.
खासदाराच्या मुलासोबत जोडलं नाव
'सैराट'च्या यशानंतर रिंकू राजगुरूचं नाव अनेक वेळा चर्चेत आलं. काही काळापूर्वी तिचं नाव खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक याच्याशी जोडलं गेलं. कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात दोघे एकत्र दर्शन घेताना दिसले आणि फोटो व्हायरल झाला. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. पण कृष्णराजने स्पष्ट केलं की ते दोघं फक्त चांगले मित्र आहेत.
रिंकूचं वर्कफ्रंट
'सैराट'नंतर रिंकूने कागर, मनसु मल्लिगे (सैराटचा कन्नड रिमेक) हंड्रेड, झिम्मा सारख्या सिनेमात काम केलं. आज रिंकू राजगुरू ही केवळ मराठी सिनेसृष्टीतील एक महत्वाचं नाव आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.