'एक वेळ अशी होती की...', विराट कोहलीसोबत अ‍ॅड शूट, श्रृती मराठेनं शेअर केला सेटवरचा अनुभव

Last Updated:
Shruti Marathe on Virat Kohli : अभिनेत्री श्रृती मराठे हिनं नुकतीच क्रिकेटर विराट कोहलीबरोबर एक जाहिरात शूट केली. या जाहिरातीत विराटसोबत काम करण्याचा अनुभव तिनं शेअर केला आहे.
1/8
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

advertisement
2/8
विराटच्या या अनपेक्षित निर्णयानंतर क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडूंनी आणि सेलिब्रिटींनी त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवत त्याचे कौतुक केलं आहे.

3/8
अशातच अभिनेत्री श्रुती मराठे हिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने विराटसोबत जाहिरात करतानाचा अनुभव शेअर केला होता.

4/8
नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने विराट कोहलीसोबत जाहिरात शूट करतानाचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, "मला वाटलं होतं की विराट कोहलीसोबत शूट करताना खूप सुरक्षा असेल, खूप बंधनं असतील आणि पटकन शूट करून त्याला सोडावं लागेल. पण प्रत्यक्षात तो खूपच चिल्ड आऊट आणि मस्त स्वभावाचा आहे."

5/8
तिने पुढे सांगितलं की, "त्या शूटला विराटसोबत कृणाल पांड्या सुद्धा होता. दोघंही मस्त गप्पा मारत होते. एक वेळ तर अशी आली की ते दोघं मीम्सवर चर्चा करत होते. मला वाटलं, हे लोकही सोशल मीडियावरील मीम्स, ट्रेंड्स बघतात आणि हे पाहून खरंच आश्चर्य वाटलं."

6/8
श्रुतीने सांगितलं की, "शूटदरम्यान खूप रिटेक्स झाले कारण वेगवेगळ्या अँगल्सने शूटिंग चालू होतं. पण तरीही विराट किंवा इतर कोणीही कधीही कंटाळले नाही". 

7/8
"ते इतक्या जाहिराती करतात की त्यांना सगळं व्यवस्थित माहीत असतं. जेव्हा मला कळलं की विराटसोबत जाहिरात आहे. तेव्हा मला उलट टेन्शन आलं की आपल्याला काही संवाद असतील की नाही. पण सर्व अनुभव खूप छान होता", असंही श्रुतीने सांगितलं."ते इतक्या जाहिराती करतात की त्यांना सगळं व्यवस्थित माहीत असतं. जेव्हा मला कळलं की विराटसोबत जाहिरात आहे. तेव्हा मला उलट टेन्शन आलं की आपल्याला काही संवाद असतील की नाही. पण सर्व अनुभव खूप छान होता", असंही श्रुतीने सांगितलं.
"ते इतक्या जाहिराती करतात की त्यांना सगळं व्यवस्थित माहीत असतं. जेव्हा मला कळलं की विराटसोबत जाहिरात आहे. तेव्हा मला उलट टेन्शन आलं की आपल्याला काही संवाद असतील की नाही. पण सर्व अनुभव खूप छान होता", असंही श्रुतीने सांगितलं.
advertisement
8/8
श्रुती मराठे म्हणाली, "मी स्वतः क्रिकेटप्रेमी आहे. भारताचा सामना कुठल्याही देशाविरुद्ध असेल तरी मी न चुकता तो पाहते. त्यामुळे विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूसोबत काम करणं ही खूप मोठी गोष्ट होती."

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement