करिश्माच्या मुलांचं म्हणणं आहे की, प्रिया कपूर यांनी वडिलांच्या मृत्युपत्रात छेडछाड केली आहे, जेणेकरून संपूर्ण मालमत्ता त्यांच्या ताब्यात जाईल. एवढंच नाही, तर वडिलांच्या निधनानंतर त्यांना मालमत्तेबाबत योग्य माहिती लपवण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
'एवढ्या यातना...ती सुटली बरं झालं' प्रिया मराठेच्या निधनावर पहिल्यांदाच व्यक्त झाली अभिनेत्री
न्यायालयाने प्रिया कपूर यांना संजय कपूर यांच्या सर्व मालमत्तेची संपूर्ण माहिती सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार असून, तोपर्यंत मालमत्तेच्या वाटणीवर स्थगिती लागू शकते.
advertisement
दरम्यान, प्रिया कपूरच्या वकिलांनी कोर्टात ठामपणे मांडणी केली की, “संजय कपूर यांच्या मृत्युसमयी प्रिया त्यांची कायदेशीर पत्नी होत्या. करिश्मा कपूरसोबतचा घटस्फोट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. मग आता अचानक 15 वर्षांनी ‘प्रेम आणि जवळीक’ याचा दावा का केला जातोय?”
दिल्ली न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, प्रिया कपूरच्या वतीने युक्तिवाद करताना वकील राजीव नायर यांनी सांगितलं, मी एक विधवा आहे जिला 6 वर्षांचं मूल आहे. हे लोक 15 वर्षांपासून कुठे दिसले नाहीत आणि आता संपत्तीवरून आरोप करत आहेत.
प्रिया कपूरच्या वतीने आणखी सांगण्यात आलं की, संजय कपूर यांनी एक ट्रस्ट स्थापन केला होता. खटला दाखल होण्याच्या काही दिवस आधी, ट्रस्टच्या कागदपत्रांनुसार सुमारे 1900 कोटी रुपयांची मालमत्ता मुलांच्या नावावर करण्यात आली होती. दुसरीकडे, करिश्माच्या वकिलांनी मात्र वेगळं चित्र मांडलं. “सुरुवातीला प्रियाने आम्हाला सांगितलं की मृत्युपत्र अस्तित्वातच नाही. नंतर मात्र ट्रस्ट आणि इतर मालमत्तेच्या गोष्टी समोर आल्या. याबाबत अनेक गोष्टी लपवण्यात आल्या आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
एएनआयच्या वृत्तानुसार, करिश्मा कपूर सध्या मुलांची कायदेशीर पालक म्हणून उच्च न्यायालयात हा खटला चालवत आहे. मुलांची स्पष्ट मागणी आहे, “वडिलांच्या प्रचंड संपत्तीचा संपूर्ण हिशेब आमच्यासमोर आणला जावा आणि योग्य वाटणी केली जावी.”