अंगावर शहारे आणणारा टीझर!
सुमारे दोन मिनिटांच्या या टीझरमध्ये सनी देओलचा तोच जुना करारी बाणा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सोबतच वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार सीमेवर शत्रूशी दोन हात करताना दिसत आहेत. टीझर पाहून अक्षरशः अंगावर शहारे येतात. सनी देओलने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत एक धमाकेदार कॅप्शन दिले, "आवाज कुठपर्यंत जायला हवा?" सनी देओलच्या या प्रश्नावर आता थेट त्याच्या सावत्र बहिणीने उत्तर दिलं आहे.
advertisement
आता घरबसल्या पाहा Dhurandhar चा धमका, समोर आली OTT रिलीजबद्दल मोठी अपडेट, कधी आणि कुठे पाहता येणार?
नात्यातील दुरावा विसरून दिलेली दाद!
सनी देओलने शेअर केलेल्या या टीझरला २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, पण त्यात एका लाईकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही लाईक दुसरी तिसरी कोणाची नसून सनीची सावत्र बहीण ईशा देओल हिची आहे. देओल कुटुंबात गेल्या काही काळात निर्माण झालेला दुरावा आता कमी होताना दिसत आहे. ईशाने या टीझरला लाईक करून आपल्या भावाच्या कामाचे आणि हिंमतीचे कौतुक केले आहे. केवळ ईशाच नाही, तर 'धुरंधर' फेम अभिनेता अर्जुन रामपाल यानेही या टीझरवर आपली पसंती दर्शवली आहे.
दु:खाच्या सावटातही कर्तव्याला प्राधान्य
देओल कुटुंबासाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे सनी देओल आणि संपूर्ण कुटुंब दु:खात बुडाले आहे. मात्र, वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून सनी देओलने 'बॉर्डर २' च्या टीझर लॉन्चला उपस्थिती लावली. वडिलांच्या निधनानंतर सनी सार्वजनिकरीत्या पहिल्यांदाच या कार्यक्रमात दिसला.
कधी रिलीज होणार फिल्म?
जेपी दत्ता आणि भूषण कुमार यांची निर्मिती असलेला आणि अनुराग सिंह यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. १९९७ च्या मूळ 'बॉर्डर'चा वारसा हा सिनेमा किती प्रभावीपणे पुढे नेतो, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
