काजोल आणि ट्विंकलचा 'कॉमन एक्स'
'एग्री या डिसएग्री' राउंडमध्ये जेव्हा विचारण्यात आले, "बेस्ट फ्रेंड्सनी एकमेकांच्या एक्सला डेट करू नये?" यावर ट्विंकलने लगेच सहमती दर्शवत म्हटले, "माझे मित्र माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. बॉयफ्रेंड तर कुठेही मिळेल." पण लगेच काजोलकडे पाहत ती हसत म्हणाली, "आमचा एक एक्स बॉयफ्रेंड कॉमन आहे, पण आम्ही त्याचे नाव घेऊ शकत नाही!"
advertisement
ट्विंकलने हा बाँब टाकताच, काजोल लगेच ओरडली, "गप्प राहा! मी तुला विनंती करते!" या दोघांच्या शोमध्ये नात्यांवरील चर्चा रोमाँसकडे वळली. क्रिती सेननने कबूल केले की, ती प्रेमाबद्दल होपलेस आहे. तिचा सध्याचा पार्टनर इंडस्ट्रीमधील नाही, याचा तिला आनंद आहे.
लग्नाच्या एक्स्पायरी डेटवर काजोलचं स्पष्ट मत
ट्विंकलने पुढे प्रश्न विचारला, "लग्नाला 'एक्सपायरी डेट' आणि 'रिन्यूअल'चा पर्याय हवा का?" यावर ट्विंकल, विकी आणि क्रितीने 'नाही' म्हटले, पण काजोलने 'होय' म्हटले. काजोलने ठामपणे सांगितले, "याची काय गॅरंटी की तुम्ही योग्य वेळी योग्य व्यक्तीशी लग्न कराल? रिन्यूअलचा पर्याय योग्य वाटतो आणि एक्सपायरी डेटमुळे कोणालाही जास्त काळ त्रास सहन करावा लागणार नाही."
"पैशाने आनंद विकत घेता येतो," या प्रश्नावर ट्विंकल आणि विकी सहमत झाले, तर काजोलने असहमती दर्शवत म्हटले, "पैसा तुम्हाला खऱ्या आनंदापासून वंचित करतो." दरम्यान, काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या या शोमुळे बॉलिवूडमधील अनेक किस्से उघड होत आहेत.
