कच्चा मध त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. मध लावल्यानं बॅक्टेरिया कमी होतात, मृत त्वचा काढून टाकली जाते. चेहऱ्यावर चमक येते असं हेल्थलाइनच्या अहवालात नोंदवण्यात आलंय. पाहूयात मधाचे उपयोग आणि त्याचा वापर कसा करायचा.
Arthritis : आहारात असू शकतात संधिवात वाढण्याची कारणं, जाणून घ्या सविस्तर
मधामधे एंजाइम, वनस्पती संयुगे, फायदेशीर बॅक्टेरिया, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. कच्चा आणि पाश्चराइज्ड नसलेला मध त्वचेसाठी अधिक प्रभावी मानला जातो.
advertisement
मुरुमांपासून आराम - मधामुळे बॅक्टेरिया कमी होतात आणि सूज कमी होते. मुरुम, सोरायसिस आणि एक्झिमा सारख्या त्वचेच्या समस्यांसाठी मध लावणं उपयुक्त ठरू शकतं.
मॉइश्चरायझर - मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझिंग एजंट आहे, यामुळे त्वचेतला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. दररोज मध चेहऱ्यावर लावल्यानं कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा मऊ राहते.
त्वचा उजळते - मधात सौम्य एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात, यामुळे मृत त्वचा काढून टाकली जाते आणि यामुळे चेहरा चमकदार दिसतो.
डाग आणि चट्टे कमी होतात - मधामुळे मुरुमांच्या खुणा आणि किरकोळ चट्टे हळूहळू कमी होतात.
Bones Health : हाडं ठिसूळ करणाऱ्या पदार्थांना करा बाय, लगेचच बदला चुकीच्या सवयी
चेहऱ्याला मध लावण्यासाठी, आधी चेहरा फेसवॉशनं धुवा. कच्च्या मधाचा पातळ थर चेहऱ्यावर लावा.
दहा-पंधरा मिनिटं तसंच राहू द्या. नंतर चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा आणि हळूवारपणे पुसून कोरडा करा.
आवडत असेल तर, थोडीशी दालचिनी आणि मध मिसळून फेस पॅक बनवू शकता, परंतु ही पेस्ट लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. बहुतेकांना मधाची अॅलर्जी नसते, पण जर परागकण किंवा मधमाशीची अॅलर्जी असेल तर सावधगिरी बाळगा. नेहमी पॅच टेस्ट करा.
चेहऱ्यावर दररोज कच्चा मध लावल्यानं त्वचा स्वच्छ, हायड्रेटेड आणि चमकदार राहण्यास मदत होते. रात्रभर मध चेहऱ्यावर लावणं टाळा आणि लावण्यापूर्वी नेहमीच पॅच टेस्ट करा. तसंच चेहऱ्यावर रोजच मध लावावा का याविषयी त्वचा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
