जाणून घेऊयात हिवाळ्यात मायग्रेनच्या दुखण्यावर काळी मिरी कशी गुणकारी ठरते ते.
आयुर्वेदिक डॉ. प्रमोद तिवारी सांगतात की, ‘जेव्हा शरीरातील नसा ताणल्या जाऊन त्या आकुंचन पावतात तेव्हा मायग्रेनचा वेदनादायक त्रास सुरू होतो. मायग्रेनमुळे फक्त डोकेदुखीच नाही तर संपूर्ण शरीराला तीव्र वेदना होतात. डोक्यापासून सुरू होणाऱ्या या वेदना मान, खांदे, पाठ आणि हातापर्यंत पसरतात. त्यामुळे मायग्रेनकडे दुर्लक्ष करणं हे आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. काही वेळा मायग्रेनचा त्रास इतका तीव्र असतो की तो सुरू झाला की त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. त्यामुळे त्रास झाल्यानंतर औषधं घेण्यापेक्षा त्रास होऊ नये म्हणून काळजी करणं हे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी हिवाळ्यात नियमितपणे काळीमिरी खाल्ली तर निश्चितपणे मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.
advertisement
काळ्यामिरीचे औषधी गुणधर्म
काळीमिरी हा एक उष्ण स्वभावाचा गरम मसाला आहे. त्यामुळे हिवाळ्यात थंडीमुळे शरीराचं तापमान कमी होत असताना काळीमिरी खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहू शकतं. याशिवाय काळ्यामिरीत असलेल्या पिपेरिनमुळे ती दाहकविरोधी ठरते. यामुळे सूज किंवा दुखण्यापासून आराम मिळू शकतो. हिवाळ्यात 1 किंवा 2 काळ्यामिरीचे दाणे चावून खाल्ल्याने मायग्रेन आणि अन्य दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
काळ्यामिरीचे तोटे
काळीमिरी हा एक शक्तिशाली गरम मसाला आहे. त्यामुळे नियंत्रित प्रमाणात काळीमिरी खाणं फायद्याचं ठरतं. काळीमिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने घशात किंवा पोटात जळजळ, ॲसिडिटी अशा विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय नाकातून रक्त येण्याची भीती असते. त्यामुळे काळीमिरी खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणत्या आरोग्यविषयक समस्या असतील त्रास झाला किंवा तुम्हाला कोणते गंभीर आजार असतील तर काळीमिरी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. योग्यप्रमाणात काळीमिरी खाल्ल्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील आणि साइड इफेक्ट्सचा धोकाही कमी होईल.
जर तुम्हाल थेट काळीमिरी खाणं आवडत नसेल तर विविध अन्नपदार्थांमध्ये मिसळून खाल्ल्यास जेवणाची चवही वाढेल आणि तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याची ठरेल.