Migraine In Women : 'या' कारणांमुळे महिलांना जास्त होतो मायग्रेनचा त्रास! तुलनेत पुरुष असतात सुखी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Migraine Causes : स्त्रियांना पुरुषांपेक्षा 2-3 पट जास्त वारंवार डोकेदुखीचा अनुभव येतो आणि त्यांना मायग्रेनचा त्रास बहुतेकदा पौगंडावस्थेत होतो. चला तर मग जाणून घेऊया, स्त्रियांमध्ये मायग्रेनची कारणं काय असतात.
मुंबई : मायग्रेन ही सामान्य डोकेदुखी नाही. जर तुम्हाला याचा अनुभव आला असेल, तर तुम्हाला माहित असेल की मळमळ, जास्त प्रकाश किंवा थोड्याशाही आवाजाचा मायग्रेनचा रुग्णाला त्रास होतो. त्यासोबतच अस्पष्ट दृष्टी यासारख्या समस्यांसह ही तीव्र डोकेदुखी असते. पण तुम्हाला माहितीये का? 90-95% लोक त्यांच्या आयुष्यात मायग्रेनने ग्रस्त आहेत. परंतु, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा त्रास सर्वात जास्त दिसतो.
स्त्रियांना पुरुषांपेक्षा 2-3 पट जास्त वारंवार डोकेदुखीचा अनुभव येतो आणि त्यांना मायग्रेनचा त्रास बहुतेकदा पौगंडावस्थेत होतो. चला तर मग जाणून घेऊया, स्त्रियांमध्ये मायग्रेनची कारणं काय असतात. तसेच याची लक्षणं आणि त्यावर आपण उपाय करू शकतो, हे देखील पाहूया.
मायग्रेनच्या कारणास्तव हार्मोन्स महत्वाची भूमिका बजावतात; त्यामुळे महिलांना याचा जास्त त्रास होतो. जीवनशैली आणि अनुवांशिक घटक यासारख्या अनेक कारणांमुळे दीर्घकालीन मायग्रेन होऊ शकतो. मायग्रेनने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये सामान्य लक्षणांमध्ये अंधुक दृष्टी, वारंवार जांभई आणि तंद्री, एकतर्फी डोकेदुखी आणि उलट्या यांचा समावेश होतो. मायग्रेनची ही लक्षणे एपिसोडिक डोकेदुखी म्हणून येतात.
advertisement
स्त्रियांमध्ये मायग्रेनची प्रमुख कारणं..
पीरियड्स : पिरीएड्सच्या आधी आणि पिरीएड्सदरम्यान महिलांच्या शरीरात हॉर्मोनल चेंजेस होतात. त्यामुळे या काळात मायग्रेन होण्याची जास्त शक्यता असते. पिरीएड्सच्या एक दिन दिवसांपूर्वीपासून स्त्रियांना मायग्रेनचा त्रास हाऊ शकतो.
मोनोपॉज : स्त्रियांची मासिक पाळी संपते म्हणजेच जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन हॉर्मोन अनियंत्रित होते. त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना मेनोपॉजनंतर मायग्रेनची समस्या भेडसावते.
advertisement
नाश्ता न करणे : बऱ्याचदा महिला डायेटिंगच्या नादात किंवा कामाच्या व्यस्ततेमुळे नाश्ता करते टाळतात. मात्र तज्ज्ञांच्या मात्र, नाश्ता न करण्याची सवय झाल्यास त्यामुळे मायग्रेनची समस्या निर्मण होते.
तणाव : हल्ली काम आणि घर सांभाळताना महिलांना बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टींचंही खूप टेन्शन घेतात. वाढत्या तणावामुळे महिलांमध्ये मायग्रेनचा त्रासही वाढतो.
advertisement
मायग्रेनची लक्षणं..
मायग्रेनच्या रुग्णाचे अर्धे डोके दुखते. हे मायग्रेनचे प्रमुख लक्षण असू शकते. तसेच डोक्यात काहीतरी खूप भयंकर पद्धतीने टोचत आहे असे वाटते. मायग्रेन 2 ते 72 तास सतत होऊ शकतो. मायग्रेनदरम्यान व्यक्तीला तीव्र प्रकाश आणि आवाजाचा त्रास होतो. त्यामुळे त्यांची चिडचिड होते. इच्छा होत नाही. ही सर्व मायग्रेनची लक्षणे आहेत.
advertisement
मायग्रेनवर प्रभावी उपाय..
पुरेशी झोप घेणे : योग्य प्रमाणात झोप घेतल्यास तुमची उर्जा पातळी वाढते आणि तुम्हाला कमी चिडचिड, दडपण जाणवते.
गाणी ऐकणे : हे नाडी आणि हृदय गती कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि तणाव संप्रेरकांची पातळी कमी होते.
व्यायाम : व्यायामामुळे शरीरातील एड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल सारख्या तणावाच्या संप्रेरकांची पातळी कमी होते आणि एंडोर्फिनचे उत्पादन उत्तेजित करते. एंडोर्फिन हे मेंदूतील रसायन आहे, जे नैसर्गिक वेदनाशामक आणि मूड एलिव्हेटर म्हणून काम करते.
advertisement
निरोगी आहार : व्हिटॅमिन के सारख्या आवश्यक जीवनसत्त्वे पुरवू शकणाऱ्या पालेभाज्यांचा समावेश करून आरोग्यदायी आहार घेतल्यास तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते. तुमच्या धमन्यांचे संरक्षण होते आणि रक्त गोठण्यास मदत होते. संतुलित आहारामध्ये आहारातील नायट्रेट्स देखील असतात, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, धमन्यांचा कडकपणा कमी करतात आणि रक्तवाहिन्यांच्या अस्तर असलेल्या पेशींचे कार्य सुधारतात.
advertisement
ध्यान : हे आणखी एक प्रभावी तंत्र आहे, जे तुम्हाला तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत करू शकते. शांत झोपेसाठी ध्यान आवश्यक आहे. हे नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक विकारांच्या लक्षणांचा सामना करण्यास मदत करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2024 4:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Migraine In Women : 'या' कारणांमुळे महिलांना जास्त होतो मायग्रेनचा त्रास! तुलनेत पुरुष असतात सुखी