TRENDING:

Homemade Lip Balm: हिवाळ्यात फाटतात तुमचे ओठ, मग घरीच बनवा तुमच्या आवडीचा इकोफ्रेंडली लिपबाम

Last Updated:

Tips to make Homemade Lip Balm: हिवाळ्यात ओठ फाटण्यावर लिपाबाम लावल्याने काही अंशी आराम मिळू शकतो. मात्र लिपबामध्ये असलेले केमिकल्स पोटात जाऊन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरीच इकोफ्रेंडली लिपबाम बनवण्याची पद्धत सांगणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: हिवाळ्यात थंडी आणि कोरड्या वातावरणाचा परिणाम त्वचेवर होत असतो. त्वचा कोरडी पडणे, हातापायांना भेगा पडणे किंवा ओठांना भेगा पडून ओठ फाटणे आणि त्यातून रक्त येणं या काही सामान्य तक्रारी आहेत. लिपाबाम लावल्याने काही अंशी ओठांना आराम मिळू शकतो. मात्र त्यात असलेले केमिकल्स पोटात जाऊन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अनेक जण हिवाळ्यात लिपबाम लावणं टाळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला घरीच लिपबाम बनवण्याची पद्धत सांगणार आहोत.
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात ओठ फाटतात? घरीच बनवा तुमच्या आवडीचा लिपबाम
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात ओठ फाटतात? घरीच बनवा तुमच्या आवडीचा लिपबाम
advertisement

आवश्यक सामग्री

घरी लिप बाम बनवण्यासाठी तुम्हाला मध, खोबरेल तेल, मधमाशीचं मेण आणि व्हिटॅमिन ई. यांची आवश्यकता पडेल. हे सर्व पदार्थ ओठांना नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवण्याचं काम करतात. यामुळे ओठ मुलायम राहायला मदत होत. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे जळजळ आणि संसर्गापासून ओठांचा बचाव होऊ शकतो.  फाटलेल्या किंवा भेगा पडलेल्या ओठांवर तुम्ही थोडंसं मध लावल्याने तुम्हाला फायदा होईल. वाचवण्यास मदत करतात.

advertisement

हे सुद्धा वाचा :फाटलेल्या ओठांवर, ओठांच्या काळपटपणावर जबरदस्त उपाय, वापरा देशी लिप बाम!

घरीच लिपबाम कसा तयार करायाचा ?

घरीत लिप बाम तयार करणं सोपं आहे. सगळ्यात आधी खोबरेल तेल आणि मधमाशीचं मेण एकत्र करून ते वितळवून घ्या. मग त्यात मध आणि व्हिटॅमिन ईचं तेल टाका. गरम असताना पूर्ण मिश्रण व्यवस्थितपणे ठवळून घ्या.जेणेकरून त्यातले सगळे पदार्थ एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून जातील. मिक्स केल्यानंतर या मिश्रणाला एका छोट्या डबीत किंवा वाटीत काढून त्याला थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर तुमचं घरगुती नैसर्गिक लिप बाम तयार झालेलं असेल. या लिपबाममध्ये कोणतीही रसायनं नसल्याने या बामच्या वापराने तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. या नैसर्गिक लिपबामचा वापर तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा करू शकता. नैसर्गिक पदार्थांच्या वापराने तयार झालेला हा लिपबाम दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे ओठ दीर्घकाळ मुलायम आणि तजेलदार राहायला मदत होते.

advertisement

लिप बामला पर्याय

जर तुम्हाला वर सांगितलेल्या पद्धतीने लिपबाम बनवता येत नसेल तर तूप किंवा तवकीर लावण्याचा सल्ला आपली आजी किंवा आई देते. तुपातले फॅट्समुळे ओठांच्या त्वचेच्या खोलवर जाऊन त्वचा हायड्रेट ठेवायला मदत करतात. त्यामुळे ओठ कोरडे पडण्याची समस्या काही अंशी कमी होऊ शकते. तुम्ही ओठांना तवकीर लावल्यामुळे त्यात असलेल्या औषधी गुणधर्मांचा फायदा ओठांना होतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Homemade Lip Balm: हिवाळ्यात फाटतात तुमचे ओठ, मग घरीच बनवा तुमच्या आवडीचा इकोफ्रेंडली लिपबाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल