फाटलेल्या ओठांवर, ओठांच्या काळपटपणावर जबरदस्त उपाय, वापरा देशी लिप बाम!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आता सगळीकडे छान गारवा जाणवू लागलाय. गुलाबी थंडी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. परंतु थंडीसोबत येणारा त्वचेचा रखरखीतपणा मात्र नकोसा होतो. आज आपण थंडीतही ओठ मऊ आणि गुलाबी कसे ठेवायचे यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत. (लता प्रसाद, प्रतिनिधी / बागेश्वर)
आयुर्वेदाच्या जाणकार किरण पांडे यांनी सांगितलं की, देशी तुपात अनेक पोषक तत्त्व असतात. हे नैसर्गिक मॉइस्चरायजर म्हणून आपण वापरू शकता. तुपामुळे ओठ अनेक तास हायड्रेटेड राहू शकतात, तसंच मऊ, चमकदार होतात. ओठांवरचा काळसरपणा निघून जातो. ओठ फाटत नाहीत आणि गुलाबी राहतात. एकूणच, तूप हे ओठांच्या सर्व समस्यांवर आरामदायी असतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement