Homemade Lip Balm : हिवाळ्यात घरातील 'या' पदार्थांचा वापर करून तयार करा 5 प्रकारचे लिप बाम
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही निवडक पदार्थांपासून लीप बाम तयार करू शकता.
हिवाळ्यात अनेकदा तापमानात घट झाल्याने ओठ फुटण्याची समस्या जाणवते. बऱ्याचदा ओठ फुटून त्यातून रक्त देखील येत. बाजारात हिवाळ्यात ओठांना मऊ ठेवण्यासाठी अनेक लीप बाम उपलब्ध असतात, परंतु अनेकदा त्यांच्यात केमिकलचा वापर केला जातो. तेव्हा थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही निवडक पदार्थांपासून लिप बाम तयार करू शकता.
गुलाब आणि दूध लिप बाम : गुलाबाच्या सहा पाकळ्यांना तुम्ही अर्धा कप दुधात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाकळ्या काढून त्यांना मॅश करा आणि त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट दुधात मिसळून ओठांवर 15 मिनिट लावावी आणि मग धुवून टाकावी.
advertisement
गुलाब आणि बदाम लिप बाम : गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये बदामाचे तेल, शिया बटर आणि बी वॅक्स मिसळा. हे मिश्रण मायक्रोव्हेवमध्ये गरम करा आणि काहीवेळाने थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. हे मिश्रण तुम्ही दररोज ओठांवर लावू शकता.
बिठापासून तयार झालेले लिप बाम : बिटला बारीक किसून सुती कपड्याच्या मदतीने त्याचा रस काढून घ्या. या रसामध्ये खोबरेल तेल, व्हिटॅमिन इ कॅप्सूल इत्यादी एकत्र करून नीट मिक्स करून घ्या. अशा प्रकारे तुमचे बिट लीप बाम तयार होते.
advertisement
ग्रीन टी लिप बाम : ग्रीन टी लीप बाम तयार करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम नारळाचे तेल गरम करून घ्या आणि त्यात ग्रीन टी चे सॅशे डुबवून ठेवा. मग यात बी जवॅक्स देखील मिसळून हे मिश्रण मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. मग लीप बाम थंड झालं की ते तुम्ही दररोज ओठांवर लावण्यासाठी वापरू शकता.
शिया बटर लिप बाम : शिया बटर लीप बाम बनवण्यासाठी शिया बटर आणि नारळाचे तेल मिक्स करा मग यात बी वॅक्स टाका आणि त्याला वितळवा. तुम्ही हे लीप बाम दररोज लावू शकता आणि काही दिवसातच ओठांवर याचा चांगला फरक तुम्हाला कळून येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 16, 2024 7:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Homemade Lip Balm : हिवाळ्यात घरातील 'या' पदार्थांचा वापर करून तयार करा 5 प्रकारचे लिप बाम