Health Tips : मधात मिसळून दररोज खा 2 गोष्टी, काही दिवसात चषमा उतरलाच म्हणून समजा
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
चांगला आहार न घेतल्याने डोळ्यांना योग्य पोषण देखील मिळत नाही, परिणामी डोळ्यांवर चषमा लागतो. तेव्हा तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्याचा नंबर कमी होईल आणि दृष्टी सुधारू शकेल.
सध्या अनेक लोक कॉम्पुटरवर काम करत असल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊन डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन असल्याने स्क्रिन टाईम वाढला आहे. तसेच चांगला आहार न घेतल्याने डोळ्यांना योग्य पोषण देखील मिळत नाही, परिणामी डोळ्यांवर चषमा लागतो. तेव्हा तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्याचा नंबर कमी होईल आणि दृष्टी सुधारू शकेल.
अश्वगंधा, मुलेठी आणि मध इत्यादी खाल्ल्याने तुमची डोळ्यांची दृष्टी सुधारू शकते. अश्वगंधा, मुलेठी आणि मध इत्यादी मध्ये इंफ्लेमेटरी गुण असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. यात अँटी बॅक्टीरियल गुण देखील असतात ज्यामुळे डोळ्यांचे इंफेक्शन देखील दूर होते. झोपेशी निगडीत संस्यांवर देखील हा रामबाण ईलाज आहे. याचे सेवन केल्याने मानसिक तणाव, श्वसनाच्या समस्या, शरीरातील सूज इत्यादी आजारांवर परिणामकारक ठरते.
advertisement

अश्वगंधा
तज्ञ सांगतात की, 10 ग्रॅम अश्वगंधा चूर्ण आणि एक चमचा मधात मिसळून गरम पाण्यासोबत मिसळून दूधा सोबत खाऊ शकता. रोज झोपण्यापूर्वी किंवा सकाळी याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. तसेच कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.
advertisement
यासह तुम्ही दररोज सकाळी गवतावर अनवाणी पायांनी चालल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारू शकते. तेव्हा सकाळी गवतावर अनवाणी पायांनी चालल्याने आपल्या शरीराच्या संपूर्ण दबाव पायाच्या बोटांवर पडतो. पायाच्या बोटांवर प्रेशर पडल्याने, डोळ्यांची दृष्टी सुधारते. याशिवाय हिरवेगार गवत पाहून डोळ्यांना आराम देखील मिळतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 16, 2024 3:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : मधात मिसळून दररोज खा 2 गोष्टी, काही दिवसात चषमा उतरलाच म्हणून समजा