नाशिक : अनेक लोकांची आवड ही आज त्यांची ओळख बनत गेली आहे. आपल्याला असलेला छंद हा व्यवसायात उभा करून देखील अनेक लोक आज पुढे चालली आहेत. नाशिकमधील नावेद सैयद या तरुणाने देखील त्याला आवडत असलेल्या चॉकलेटचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यामधून त्याला महिन्याकाठी 1 लाखांहून अधिक कमाई होत आहे.
advertisement
नावेद सैयद हा पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याची नाशिकमध्ये कंपनी देखील आहे. परंतु नाशिकमध्ये सर्वत्र आपले नाव पोहोचावे आणि आपली ओळख लोकांना व्हावी याकरिता त्याने स्वतःचा मकाको चॉकलेट ब्रँड तयार केला आहे. कोरोना काळानंतर सर्वच चॉकलेट तसेच केक बनवायला शिकले. पहायला गेल तर चॉकलेट कोणाला आवडत नाही? ह्या विचाराने नावेद याने देखील चॉकलेट कंपनी सुरू करण्याची कल्पना आपल्या घरच्यांसोबत मांडली. त्यानंतर नावेद याच्या भाऊ-बहिणींनी देखील त्याला प्रोत्साहन दिले.
कुटुंब मोठे असल्याने प्रत्येकाची जीभेची चव ही वेगवेगळी असते हे मात्र घरात चॉकलेट बनवताना समजले. त्यानंतर आपले क्षेत्र वेगळे असून देखील आपल्याला काहीतरी नवीन करावयाचे आहे म्हणून वेगवेगळ्या फूड व्हिडिओच्या माध्यमातून चॉकलेट बनवतं गेलो, असं नावेद सांगतो.
त्यानंतर स्वतःचे नवीन ब्रँड त्याने केला. व्यवसायात नवीन असल्याने अडचणी देखील येत गेल्या परंतु जिद्द ठेवल्याने आज स्वतःचे एक नाव बनवले असल्याचा अभिमान नावेदला आहे. ह्या व्यवसायाच्या माध्यमातून नावेद हा महिन्याला 1 लाखांच्यावर उत्पन्न देखील कमवतो.
कुठल्या प्रकारचे चॉकलेट विकतो नावेद?
नावेद हा स्वतः सर्व चॉकलेट बनवतो. त्याच्याकडे 20 पेक्षा अधिक फ्लेवरच्या चॉकलेट मिळतात. यात शुगरफ्री चॉकलेट देखील त्याच्याकडे उपलब्ध आहेत. तसेच इंग्लंडमध्ये सर्वाधिक खाल्ल्या जाणारी कुनाफा चॉकलेट देखील त्यानी नाशिकमध्ये पहिल्यांदा बनविली आहे. तसेच कुठली डेअरी प्रॉडक्ट न वापरता बनवलेल्या चॉकलेट्स देखील त्याच्याकडे उपलब्ध आहेत. 20 पेक्षा अधिक वेगवेगळ्या चवीच्या चॉकलेट्स आज त्याच्याकडे मिळतात. या चॉकलेटची किंमत 5 रुपयांपासून असून गिफ्ट बॉक्स चॉकलेट देखील त्याच्याकडे 2000 पर्यंत मिळतात.
कुठे मिळणार यांची चॉकलेट?
मकाको चॉकलेट या ऑनलाईन देखील खरेदीसाठी त्याच्या मकाको नावाच्या साईटला उपलब्ध आहेत. तसेच नाशिकमध्ये असाल तर झोमॅटो, स्विगीला देखील उपलब्ध आहेत. इंदिरानगर परिसरातील गोल्डन नेक्स्ट अपार्टमेंट, लक्ष्मी नारायण ड्रायफ्रूटच्या अगदी बाजूला मकाको चॉकलेट या नावाने उपलब्ध होणार आहेत.