मुंबई : सतत धावणाऱ्या कधीही न थांबणाऱ्या मुंबईकरांना दैनंदिन जीवनात सर्वात जास्त साथ देतो तो म्हणजे वडापाव. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि वडापाव हे समीकरण सर्वांना चांगल माहिती आहे. वडापावला मुंबईचा खुप मोठा इतिहास लाभला आहे. मुंबईकरांना वडापाव हा नेहमीच लोकप्रिय आणि आवडता खाद्यपदार्थ आहे. कारण कमी किंमतीत सर्वांना परवडेल अशा दरात आणि सहज कुठेही विकत मिळेल, असा हा मुंबईकरांचा आवडता वडापाव नेहमीच मुंबईकरांना साथ देत असतो. मात्र आता याच वडापावमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता निर्माण होणार आहे. मुंबईचा वडापाव आता महाग होणार आहे.
advertisement
वडापावसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या पावाचे दर हे 37 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे वडापावच्या किंमतीत 2-3 रुपयांनी वाढ होणार आहे. मुंबईत ठिकठिकाणी मिळणारे वडापाव आता महाग झाले. त्यामुळे वडापाव विक्रेत्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. वडापावच्या किंमतीचा थेट फटका फक्त मुंबईकरांना लागला आहेच मात्र वडापाव विक्रेत्यांना देखील लागला आहे.
ओल्या तुरीच्या दाण्यांचा झणझणीत झुणका, हिवाळ्यात बनवा विदर्भ स्टाईल रेसिपी
मुंबईतील वडापाव विक्रेते पावाचे दर वाढल्यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. कारण नेहमीच वाढत्या महागाईमुळे कुठे ना कुठे बटाटा आणि पावा व्यतिरिक्त वडापावला लागणारी इतर सामग्रीचे देखील दर वाढत असतात. मात्र आता पावाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वडापाव विक्रेत्यांना मोठा फटका बसणार आहे.
सध्या बाजारात वडापावसाठी लागणाऱ्या बेसन, कांदे, बटाटे, लसूण, तेल यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यातच आता पावाची दर वाढ झाल्यनंतर वडापावची किंमत देखील वाढली आहे. आता 12-15 रुपये असणारा वडापाव हा 17-18 रुपयांपर्यंत मिळणार आहे, असं मुंबईतील वडापाव विक्रेते शैलेश शेलार यांनी सांगितलं.