कोल्हापूर: नाश्त्यासाठी सर्वात हलकाफुलका आणि पटकन बनणारा पदार्थ म्हणजे पोहे. सकाळच्या वेळी बऱ्याच जणांना पोहे खायला आवडतात. त्यात पोह्यांची चव वाढवण्यासाठी बटाटा, शेंगदाणे असे पदार्थही त्यामध्ये घातले जातात. मात्र पोहे खाण्याच्या काही चुकीच्या पद्धतीमुळे या पोह्यांमधील पोषक घटक शरीराला मिळतच नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांना पोहे खाल्ल्यानंतर अपचन जळजळ अशा गोष्टींचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळेच पोहे खाताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत कोल्हापूर येथील आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली आहे.
advertisement
खरंतर पोहे खाताना आपल्याला त्यावरून बारीक शेव, किसलेले खोबरे असे घटक दिले जातात. पण कधीही पोहे खाताना त्यासोबत लिंबूची एक फोड सक्तीने खावी. खरंतर लिंबू ही पोह्याची चव वाढवण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. मात्र लिंबूची फोड पोह्यासोबत असणे हे फक्त चवीसाठी नसून त्या पोह्यातील पोषक घटकांसाठी देखील उपयुक्त ठरते, असे अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
Health Tips : निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात कसा असावा आहार? फॉलो करा 'या' टिप्स
का खावी पोह्यासोबत लिंबूची फोड?
लिंबू हा 'विटामिन सी'चा एक मुख्य स्त्रोत आहे. आपल्या शरीरातील 'विटामिन सी'ची गरज हे रोज लिंबू खाल्याने पूर्ण होऊ शकते. तर पोह्यामध्ये लोह असते. पोह्यातील लोह शरीराने शोषून घेण्यासाठी त्याला 'विटामिन सी'ची साथ आवश्यकता असते. त्यामुळेच पोह्यासह जर लिंबूची फोड आवर्जून खाल्ली, तर त्या पोह्यातील सर्व पोषणमूल्ये शरीरात लवकर शोषली जाऊ शकतात, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे.
आरोग्यासाठी लाभदायी बीट; घरीच बनवा ‘या’ सोप्या पद्धतीनं लाडू रेसिपी
पोह्यातून मिळणाऱ्या लोहाचे फायदे?
पोह्यातून सर्वात महत्त्वाचे आपल्या शरीराला लोह मिळत असते. लोहामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा चांगली राहते. तसेच लोह शरीराला पोषण पुरवून त्वचा छान तजेलदार बनवते. उत्तम चयापचय आणि स्मरणशक्ती वाढीसाठी देखील लोह उपयुक्त ठरते.
दरम्यान, लिंबूमधून मिळणारे व्हिटॅमिन सी आपल्या रोगप्रतिकारशक्ती, पचन संस्था, त्वचेसाठी आवश्यक असते. मात्र जेव्हा विटामिन सी आणि लोह एकत्रित शरीरात जातात, अर्थात पोह्यासोबत लिंबू जेव्हा खाल्ला जातो. तेव्हाच ही आवश्यक पोषणमूल्ये शरीर योग्य प्रकारे शोषून घेऊ शकते, असे अमृता सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.