त्यांच्या स्टॉलवर ओले काजू, कोकम आणि आगळाची ताजेतवानी फोड, कुरडया, ऋतूनुसार मिळणाऱ्या आंबा-पोळी आणि फणस-पोळीचा गोडवा प्रत्येक पदार्थ मेड इन कोकण आहे. शिवाय कोकणातील घरगुती पद्धतीने बनवलेल्या विविध पिठांचेही येथे मोठे आकर्षण आहे. या सर्व पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिम चव नाही उलट कोकणातील संस्कृती, साधेपणा आणि मातीचा अस्सलपणा प्रत्येक घासात जाणवतो.
advertisement
किंमतीबाबतही साळवी काकांचा दृष्टिकोन अत्यंत परवडणारा आहे. फक्त 50 रुपयांपासून या पदार्थांची सुरुवात होते. मालवणातील चविष्ट सालवाले काजू 100 ग्रॅम 120 रुपये तर सोललेले काजू 130 रुपये. आंबा आणि मिरचीची घरगुती लोणची फक्त 40 रुपये प्रति पॅकेट. कोकम सरबत अर्धा लिटर 110 रुपये आणि एक लिटर 180 रुपये दराने उपलब्ध आहे. मिठाईंमध्ये खडखडे लाडू 70 रुपये आणि खाजा 80 रुपये या दरात मिळतात. चवीला परिपूर्ण आणि किमतीला परवडणारे हे सर्व पदार्थ मुंबईकरांना कोकणाशी जोडून ठेवतात.
हा कोकणी मेवा तुम्हाला दादर पश्चिम, एन. सी. केळकर रोडवरील पाटील वाडीच्या जवळ, गिरगाव पंच डेपोच्या शेजारील गल्लीत सहज सापडतो. शिवाय ग्राहकांच्या सोयीसाठी घरपोच सेवेची सुविधाही उपलब्ध आहे. 9987706011 या नंबरवर कॉल केल्यास हवे ते पदार्थ थेट घरी मिळू शकतात, फक्त पोर्टलचे शुल्क ग्राहकाने स्वतः द्यायचे असते.
कोकणाची चव, परंपरा आणि घरगुती गोडवा एका ठिकाणी अनुभवायचा असेल तर साळवी काकांचा हा पारंपरिक स्टॉल नक्कीच भेट देण्यासारखा आहे.





