मेंदूच्या वाढीसाठी आपण बदाम आणि अक्रोड हे खात असतो पण हे दोन्ही खाणं देखील आपल्या शरीरासाठी विशेष करून मेंदूसाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही बदाम खात असाल तर ते बदाम तुम्ही भिजवून खायला हवेत. सोबत तुम्ही अक्रोड देखील भिजवून जर खाल्ले तर त्यातून जास्त फायदे हे मिळतात. तसेच ते खाण्याचे प्रमाण म्हणजे, की तुम्ही साधारण चार ते पाच बदाम आणि एक मूठभर अक्रोड दररोज खाल्ले तर ते फायदेशीर ठरतात.
advertisement
लहान मुलांना तुम्ही दररोज खायला देऊ शकता. अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री असतो आणि ओमेगा थ्री देखील खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खूप असे फायदे मिळतात. तसेच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. आणि ज्या पेशी असतात, त्या डॅमेज होण्यापासूनही मदत करतं. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं आणि ते देखील खूप फायदेशीर असतं.
Health Tips : पावसाळ्यात या डाळी खाणं टाळाच; अन्यथा बिघडेल पोट, अनेक आजारांना मिळेल आमंत्रण
तसंच बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असतं आणि ते मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरतं. तसंच यामुळे मेंदूची नर्व्ह डॅमेज होण्यापासून मदत होते. तर अशा पद्धतीने याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही दररोज बदाम आणि अक्रोड खाणे गरजेचं आहे. विशेष करून तुमच्या मुलांना तुम्ही हे द्यायला हवं जेणेकरून त्यांच्या मेंदूची वाढ चांगल्या प्रमाणात होईल, असं आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितले आहे.