सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अभिजीत पळशीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पद्धत स्टेन्टशिवाय अँजिओप्लास्टी करण्यासाठी वापरली जाते. पारंपरिक पद्धतीत स्टेन्ट वापरल्याने काही वेळा रक्तवाहिन्या पुन्हा अरुंद होण्याचा धोका असतो. पण लेसरच्या सहाय्याने अचूकपणे कचरा (कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, सेल्स) नष्ट करून मार्ग मोकळा केला जातो, त्यामुळे स्टेन्ट टाकण्याची गरज राहत नाही.
advertisement
या प्रक्रियेचे अनेक फायदे आहेत:
स्टेन्ट विरहित: धातूचे कायमस्वरूपी इम्प्लान्ट टाळता येतात
जलद सुधारणा: रुग्णाला एकाच दिवशी चालणे, फिरणे शक्य होते
कमी जोखीम: अत्यंत सुरक्षित आणि अचूक प्रक्रिया
ड्रग-कोटेड बलूनचा वापर: अचूक जागी औषध पोहचवून रिस्टेनोसिसचा धोका टाळतो
स्टेन्ट ब्लॉकेज रुग्णांसाठी उपयुक्त: दुसरा स्टेन्ट न घालता अडथळा दूर करता येतो
पारंपरिक अँजिओप्लास्टीमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झालेल्या रक्तवाहिनीत जागा निर्माण करून स्टेन्ट बसवला जातो. मात्र, लेसर थेरपीमध्ये कोलेस्ट्रॉलचा कचरा थेट नष्ट केला जातो. त्यामुळे अँजिओप्लास्टीमध्ये स्टेन्टलेस मार्ग शक्य झाला आहे.
पुण्यात पार पडलेली पहिली कार्डियाक लेसर थेरपी यशस्वी ठरल्याने इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ही पद्धत विशेषतः अशा रक्तवाहिन्यांमध्ये उपयुक्त ठरते जिथे स्टेन्ट फारसे परिणामकारक ठरत नाहीत. त्यामुळे भविष्यात ही प्रक्रिया अधिक प्रमाणात स्वीकारली जाईल, अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.