रोगप्रतिकारक शिक्ती वाढवण्यास मदत
ड्रॅगन फ्रुट मध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप मदत होते. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन ई हे भरपूर प्रमाणात आहेत. आपल्याला व्हायरल आजार, डेंगू, मलेरिया, कावीळ आणि इतर सर्वच आजारांसाठी ड्रॅगन फ्रुट हे अत्यंत फायदेशीर ठरतं. ज्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत त्यांनी आवर्जून हे फळ खावं, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
advertisement
यात कोणतीही भेसळ नाही, कधी खाल्लीये का? ओरिजनल देशी गाईच्या दुधाची इन्स्टंट आईस्क्रीम
ड्रॅगन फ्रुट घ्यायचं कसं ?
आपल्या शरीरात काही सॉलिड घटक गेल्यावर किंवा नाश्ता झाल्यानंतरच ड्रॅगन फ्रुट खायला पाहिजे. ड्रॅगन फ्रुट हे दिवसातून फक्त तीनशे ग्रॅम एवढेच खायला पाहिजे. पण हे तीनशे ग्रॅम एकदाच नाही तर तुम्ही दोन दोन फोडी करून दिवसभरातून चार ते सहा वेळेस घेऊ शकता. कारण या फळांमध्ये भरपूर रीच सोर्स ऑफ अँटिऑक्सिडेंट आहेत. तसेच ते पचण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. मात्र, एकदा कापलेलं ड्रॅगन फ्रुट जास्त काळ ठेवू नये. त्याच्यावर केमिकल रिएक्शन होण्याचा धोका असतो, असंही आहारतज्ज्ञ कर्णिक सांगतात.
मसूर डाळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयुक्त, असा करा उपयोग, Video
ड्रॅगन फ्रुट हे सर्वांसाठी उपयुक्त फळ आहे. आजारी असणारे आणि नसणाऱ्यांनीही हे फळ आवर्जून खावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि दिवस चांगला जाण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. हे फळ दोन रंगात उपलब्ध आहे. पण त्यातील आरोग्यदायी गुणधर्म फायद्याचे असल्याने जे मिळेल ते खावे. हे फळ खाल्ल्यामुळे पचन संस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, असे आहारतज्ज्ञ कर्णिक सांगतात.