TRENDING:

Tanning : टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती टिप्स, त्वचेला मिळेल आराम

Last Updated:

एप्रिल, मे महिना म्हणजे उन्हानं काहिली होते आणि याचा परिणाम त्वचेवर दिसतो. बेसन आणि दही, लिंबू आणि मध आणि काकडी आणि गुलाबजल हे उपाय नियमितपणे वापरल्यानं टॅनिंग हळूहळू कमी होतं. या घरगुती उपायांनी टॅनिंग काढून टाकणं सोपं आहेच, यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि चमकदारही राहते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एप्रिल, मे महिना म्हणजे उन्हानं काहिली होते आणि याचा परिणाम त्वचेवर दिसतो. मुख्यत्वे, हात, पाय, मान, गळ्याचा भाग काळा होतो. उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल तर टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती तीन  उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील.
News18
News18
advertisement

घरगुती उपायांनी टॅनिंग काढून टाकणं सोपं आहेच, यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि चमकदारही राहते. बेसन आणि दही, लिंबू आणि मध आणि काकडी आणि गुलाबजल हे उपाय नियमितपणे वापरल्यानं टॅनिंग हळूहळू कमी होतं.

उन्हाळ्यात सूर्याच्या तीव्र किरणांचा आपल्या त्वचेवर खोलवर परिणाम होतो. सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या टॅनिंगमुळे हात, पाय आणि मानेचा रंग गडद होतो. टॅनिंग घालवण्यासाठी आणि त्वचेचा रंग नैसर्गिक पद्धतीनं जपण्यासाठी घरगुती उपचार कायम सुरक्षित आणि प्रभावी ठरतात.

advertisement

Hair Care : केसांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला, या चुका करु नका, केसांचं आरोग्य जपा

टॅनिंग दूर करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय -

1. बेसन आणि दह्याचा पॅक

बेसन आणि दह्याचं मिश्रण त्वचा स्वच्छ आणि नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. बेसनामुळे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते आणि दह्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो. हा पॅक बनवण्यासाठी, एक टेबलस्पून बेसन घ्या. त्यात एक चमचा ताजं दही घाला. हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावा आणि 15-20 मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवा.

advertisement

2. लिंबू आणि मधाचं मिश्रण

लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, यामुळे टॅनिंग कमी करण्यास मदत होते आणि मधामुळे त्वचेला पोषण मिळतं. हे मिश्रण वापरण्यासाठी एका लिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण टॅन झालेल्या भागात लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा.

Cloves : केसांच्या समस्या कमी करण्यासाठी सोपा उपाय, केसांची मुळं होतील मजबूत

advertisement

3. काकडीचा रस आणि गुलाबपाणी

काकडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि ताजंतवानं वाटतं, गुलाबपाण्यामुळे त्वचेला ओलावा आणि चमक मिळते. या उपायानं टॅनिंग तसंच त्वचेची जळजळ दूर होते. यासाठी काकडीच्या रसात गुलाबजल घाला. कापसाच्या मदतीनं टॅन झालेल्या भागावर लावा आणि वीस मिनिटांनी धुवा.

या टिप्सचा तुम्हाला उपयोग होईलच शिवाय उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरा, कोणतेही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी त्वचेसाठी सुरक्षित आहेत का याची खात्री करण्यासाठी पॅच टेस्ट करायला विसरु नका.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tanning : टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती टिप्स, त्वचेला मिळेल आराम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल