कसं करावं कपालभाती प्राणायम?
कपाल म्हणजे आपलं मस्तीष्क आणि भाती म्हणजे तेज, चमक, ललाट. आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती प्राणायमामुळे एक ग्लो निर्माण होतो. आपला चेहरा आणि शरीर चमकायला लागतं. कारण पोटासंबंधी आणि गुदद्वारा संबंधीचे विकार नाहीसे होतात. योग साधना करत असताना तीन आसनांमध्ये बसायचं असतं. सिद्धासन, सुखासन किंवा पद्मासन. आपल्याला सोयीचे होईल त्या आसनात बसून आपल्याला ही योगसाधना करायची असते. कपालभाती प्राणायाम करत असताना श्वास घ्यायचा नाही तो आपोआपच येत असतो. एका सेकंदाला एक असा झटक्याने श्वास बाहेर फेकायचा असतो. या पद्धतीने आपल्याला हे प्राणायाम करायचा आहे, असं दामोदर राऊत सांगतात.
advertisement
असाध्य रोगातून मिळेल मुक्ती, आजच सुरू करा अनुलोम विलोम, हे फायदे माहितीयेत का?
आजार होतील दूर
ज्यांना दुर्धर आजार आहेत. जसे पोटसंबंधीचे आजार आहेत,गुदद्वारा संबंधीच्या आजार आहेत. हृदयासंबंधीचे आजार आहेत, पेनक्रियासंबंधीच्या आजार आहेत. अॅसिडिटी यासंबंधीचे आजार ज्यांना असतील त्यांनी हे प्राणायाम दरररोज जास्तीत जास्त पंधरा मिनिटे किंवा आर्धा तास पर्यंत नॉन स्टॉप करायचे आहे. किडनी स्टोन जर असेल तर त्यावरही प्रणायमामुळे अराम मिळू शकतो. गरोदर महिलांनी आणि मासिक पाळी सुरू असताना हा प्राणायाम महिलांनी करणे टाळले पाहिजे, असंही दामोदर राऊत सांगतात.
हिवाळ्यात घरीच करा ‘ही’ योगासने; मन आणि शरीर राहील तंदुरुस्त Video
श्वासावरील नियंत्रणाद्वारे केले जाणारे प्राणायाम वरवर पाहता जरी सोपे वाटत असले तरी, ते करण्याचे काही नियम व योग्य पद्धती आहेत. ज्याचं पालन होणं आवश्यक असतं. योग्य पद्धत माहीत नसल्याने बरेच लोक चुकीच्या पद्धतीनेच सराव करतात. कपालभाती रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे हृदयाशी संबंधीत समस्या दूर ठेवण्यास मदत होते. अशावेळी काही खबरदारी घेणे गरजेचे असते, अशी माहिती दामोदर राऊत यांनी दिली.





