पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी?
याबाबत माहिती देताना सौंदर्यतज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, अनेकवेळा आपण केसांची काळजी घेण्यात हलगर्जीपणा करतो. पावसाळ्यात पाऊस झाला की, भिजायला सगळ्यांना आवडत. त्यावेळी केसांचे आरोग्य धोक्यात येते. केस जर सतत ओलसर राहत असतील. केसांच्या मुळाशी वेगवेगळे आजार निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी? हे माहीत असणे गरजेचे आहे.
advertisement
ओले केस बांधत आहात? तर थांबा
पुढे त्या सांगतात की, सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस जर ओले असतील तर ते लगेच बांधू नका. त्यामुळे केसांचा कुबट वास येतो आणि केसांच्या मुळाशी पुरळ येतात. त्याला खाज सुटली की, त्याचे मोठे फोड तयार होतात. त्या फोडांच्या वेदना देखील सहन कराव्या लागतात. त्याचबरोबर केसांत कोंडा सुद्धा होऊ शकतो. पावसात भिजल्यानंतरच नाही तर केस धुतल्यानंतर देखील ते कोरडे करणे गरजेचे आहे.
ओले केस कोरडे करूनच बांधून घ्यायला पाहिजे. केसांत ओलसरपणा जाणवत असेल तर ते लगेच कोरडे करायला पाहिजेत. केस कोरडे करण्यासाठी तुम्ही ड्रायर मशीन किंवा फॅनच्या हवेचा वापर करू शकता. केसांचा कुबट वास येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादा शाम्पू घेऊन त्याने केस धुवून घेऊ शकता. त्याचबरोबर केसांना कुठलेच तेल वैगेरे वापरू नका, त्यामुळे केसांच्या मुळाशी घाण जमा होऊन आजार निर्माण होतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.