TRENDING:

Summer Care : उष्णतेचे दिवसही सुपरकुल करणारे पदार्थ, शरीराला मिळेल थंडावा

Last Updated:

अतिउष्णतेमुळे काहींना अतिसार, डिहायड्रेशन, चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळ होणं आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. उष्णतेच्या लाटांपासून मुलांचं संरक्षण करणं विशेषतः महत्वाचं आहे. अशा परिस्थितीत, खाण्याच्या सवयींची काळजी घेतली तर उष्माघातापासून बचाव होऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  एप्रिल, मे आणि जूनचे काही दिवस हे वर्षातील सर्वात उष्णतेचे दिवस..कडक ऊन, आणि उष्ण वाऱ्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, दैनंदिन आहारात काही अन्नपदार्थांचा विशेष समावेश करणं आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

उन्हाळ्यात, कडक उन्हामुळे त्वचेचं नुकसान तर होतंच शिवाय उष्णतेच्या लाटेमुळे म्हणजेच गरम हवेमुळे काही जण बेशुद्ध देखील होऊ शकतात. जास्त उष्णता शरीरासाठी प्राणघातक ठरू शकते. या प्रचंड उष्णतेत तब्येत चांगली ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. 

अतिउष्णतेमुळे काहींना अतिसार, डिहायड्रेशन, चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळ होणं आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. उष्णतेच्या लाटांपासून मुलांचं संरक्षण करणं विशेषतः महत्वाचं आहे. अशा परिस्थितीत, खाण्याच्या सवयींची काळजी घेतली तर उष्माघातापासून बचाव होऊ शकतो.

advertisement

Summer Care : उन्हात गरज असेल तरच बाहेर पडा, तज्ज्ञांचा सल्ला ऐका

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय खावं - 

सातूचं पीठ - पूर्वी घराघरांत हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे सातूचं पीठ. पाण्यात कालवून, त्यात काकडी घालूनही हे पीठ चवीला छान लागतं. उष्णतेपासून वाचण्यासाठी सातूचं पीठ खाणं हा एक घरगुती उपाय आहे. सातू बार्ली किंवा हरभरा बारीक करून तयार केला जातो. हे पीठ पाण्यात विरघळवून पिता येतं. सातूच्या पिठामुळे शरीराला हायड्रेशन मिळतं. तसंच हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. उन्हाळ्यात दिवसाच्या कोणत्याही वेळी तयार करून हे थंड पेय पिता येतं. सातूचं पीठ जास्त पातळ करुन ज्यूस सारखंही पिता येतं. तसंच सातूच्या पिठाचे लाडू हा देखील पौष्टीक पर्याय आहे.

advertisement

डाळिंब - ज्या फळांमध्ये पाणी जास्त असे सर्व पर्याय उन्हाळ्यात शरीरासाठी खूपच उपयोगी आहेत. उन्हाळ्यात डाळिंब खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंबातल्या फायबरमुळे उन्हाळ्यात पचन चांगलं होतं आणि डाळिंब खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

Summer Care :  उन्हाळ्यात राहा फ्रेश, या सूपरफूड्सनी मिळेल ताकद

advertisement

पेर - नाशपती म्हणजेच पेर या फळांतही पाण्याचं प्रमाण अधिक असतं. एरवी आणि उन्हाळ्यातही शरीर निरोगी ठेवण्यासाठी पेर हा चांगला पर्याय आहे. कॅलरी कमी असल्यानं वजन कमी करण्यासाठीही पेर उपयुक्त आहे. यातही फायबर असल्यानं पचनक्रिया सुलभ होते.

पुदिना - पुदिन्याची ताजी पानं सॅलडमध्ये घालता येतात, पुदिन्याचा रस बनवून प्यायला जाऊ शकतो किंवा पुदिन्याची चटणी खाणंही उपयुक्त आहे. उन्हाळ्यात पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. 

advertisement

कलिंगड - उष्माघात टाळण्यासाठी, कलिंगड हा चांगला पर्याय आहे. कलिंगडामधे पाण्याचं प्रमाण जास्त असतं यामुळे शरीराला आवश्यक आर्द्रता मिळते आणि कडक उन्हापासून शरीराचं संरक्षण होतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : उष्णतेचे दिवसही सुपरकुल करणारे पदार्थ, शरीराला मिळेल थंडावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल