जालना: योगसाधना करण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी योगा करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर योगा परिणामकारक ठरू शकतो. याचाच प्रत्यय जालन्यातील एका सामान्य गृहिणीला आलाय. प्रचंड नैराश्य आणि लठ्ठपणा यातून जालन्यातील गीता कोल्हे यांनी मुक्ती तर मिळवली त्याचबरोबर योगाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवत तब्बल 500 महिलांना वेगवेगळ्या समस्यांमधून मुक्त केले.
advertisement
योगामुळे जीवनच बदलून गेलं
21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योग केल्याचे फायदे हे आता सर्वसामान्यांना देखील कळू लागले आहेत. योगामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांवर नियंत्रण मिळवणं देखील शक्य होतं. जालना शहरातील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या गीता कोल्हे यांना 2006 मध्ये प्रचंड नैराश्यानं ग्रासलं होतं. तसेच लठ्ठपणाने देखील त्या चिंतित होत्या मात्र योगासारखं अस्र त्यांच्या हाती आलं आणि त्यांचे जीवनच बदलून गेलं.
रक्तदाब आणि शुगर पासून मिळेल आराम; फक्त 10 मिनिट करा 'ही' थेरेपी Video
यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन योगाचे क्लास लावले. वेगवेगळे क्लास करून त्यांनी स्वतःच्या जीवनात योगाला महत्त्वाचे स्थान दिले. याचे परिणाम त्यांच्या शरीरावर तसेच मनावर देखील दिसून आले. एकेकाळी विविध हॉस्पिटलचे उंबरे झिजवलेल्या गीता कोल्हे यांनी नंतर स्वतःच योगा ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. सध्या त्या दररोज 30 महिलांना योगाचे प्रशिक्षण देतात. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 500 महिलांना योगा शिकवला आहे यातून या महिलांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल देखील झाला आहे.
महिलांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल
योगामुळे माझ्या जीवनामध्ये जो अमुलाग्र बदल झाला तो प्रत्येकाने अनुभवावा असं मला वाटतं. 2006 मध्ये मला नैराश्य तसेच लठ्ठपणा असे वेगवेगळे प्रॉब्लेम झाले होते. या समस्या वर दवाखान्यामध्ये भरपूर पैसे खर्च करूनही फारसा फरक जाणवला नाही. त्यानंतर मी वृत्तपत्रे आणि मासिके वाचल्यानंतर योगा हा या समस्यावर उपाय ठरू शकतो हे लक्षात आलं. त्यानंतर मी टीव्हीवरच पाहून योगा करू लागले. हळूहळू आवड निर्माण झाली आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथे योगाची क्लास देखील लावले. आतापर्यंत तब्बल 500 महिलांनी माझ्याकडे योगा शिकला आहे आणि त्या महिलांच्या जीवनामध्ये देखील अमुलाग्र बदल झाला आहे, असे गीता कोल्हे सांगतात.
शुगर आणि पोटाच्या विकारांवर रामबाण उपाय, काश्मिरी संत्री आता महाराष्ट्रात
मी बारावीमध्ये शिक्षण घेत आहे कॉलेज करत नसल्याने घरी झोपून असायची मात्र योगा क्लासला यायला लागल्यापासून मला अतिशय सकारात्मक वाटत आहे. सगळे नकारात्मक विचार माझ्यापासून दूर झाले आहेत, असं योग प्रशिक्षण घेणारी नेतल काबरा सांगते.





