TRENDING:

पराभवाने डोकं जड झालंय का? तुम्हाला हा गंभीर आजार, कसं बाहेर पडायचं? डॉक्टरांनी दिला सल्ला

Last Updated:

Depression: निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेकजण नैराश्याचे शिकार होतात. यातून वेळीच बाहेर न पडल्यास धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टरांनी नैराश्यातून बाहेर पडण्याचे उपाय सांगितले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : हृदयरोगानंतर नैराश्य हा आजार भारतातीलच नाही तर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा गंभीर आजार झाला आहे. काही तज्ज्ञांच्या मते मेंदूमधील रसायनांचा समतोल बिघडणे हे नैराश्याचं प्रमुख कारण असू शकतं. हे नैराश्य कोणालाच चुकलेल नाही. अगदी मोठ्या राजकीय नेत्यांपासून ते दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनाही नैराश्याचा सामना करावा लागतो. नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हे एक प्रकारची भावना आहे. एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या गोष्टीचा अति विचार केला तर ही भावना माणसांमध्ये उद्भवू शकते. त्यामुळे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी कशी काळजी घ्यावी? याबाबत कोल्हापुरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उत्तम गव्हाणे यांनी लोकल18 सोबत बोलातना माहिती दिलीये.

advertisement

नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. काही नेत्यांना यश मिळालं तर अनेक प्रयत्नानंतरही काहींच्या पदरी अपयश पडलं. पण मोठ्या प्रयत्नांनीही अपयश आल्याने काहीजण निराश झालेले आहेत. अशा काळात काहीजण तीव्र नैराश्येच्या गर्तेतही अडकू शकतात. बऱ्याचदा वेळीच उपचार न घेतल्याने टोकाचे निर्णय घेण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे नैराश्याने खचलेल्या नेते आणि कार्यकर्ते यांनी वेळीच उपचार घेण्याची गरज असल्याचं डॉक्टर सांगतात.

advertisement

Kidney Stone : तुम्हाला ही मुतखड्याचा त्रास होतोय? मग 'हे' घरगुती उपाय फायद्याचे, नक्कीच वाटेल आराम

नेते, कार्यकर्ते नैराश्याचे शिकार का?

नेते आणि कार्यकर्त्यांचा विचार केला तर पराभवानंतर त्यांना लोकांकडून मिळणाऱ्या आदरात कमतरता जाणवते. त्यांना येणाऱ्या फोन कॉलची संख्या कमी होते. कोणतीही जबाबदारी नसल्याने आदराच्या स्थानाला धक्का वाटतो. नेतृत्वावर विश्वास नसल्याची भीती सतावते. त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते नैराश्येत जाण्याची शक्यता असेत.

advertisement

नैराश्य म्हणजे काय?

डिप्रेशन ही एक मनाची अवस्था असून ती एखाद्या घटनेपासून किंवा गोष्टीपासून मिळालेल्या निराशेतून उद्भवते. निराश वाटणे ही मनाची प्राथमिक स्थिती आहे. परंतु मनाच्या अवस्थेची गंभीर स्वरूपाची पायरी समजली जाते. डिप्रेशन म्हणजे काय तर एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या गोष्टीचा अति विचार करून त्याचा मनावरती परिणाम करून घेणे किंवा त्याचं टेन्शन येऊन मनाची अवस्था बिघडवणे. परंतु, ही अवस्थान व्यवस्थित न हाताळल्यास या स्थितीच अजून गंभीर स्थितीत रूपांतर होते आणि अधिक गुंतागुंतीची अवस्था निर्माण होऊन गंभीर आजाराचा धोका निर्माण होतो.

advertisement

सुपरफूड बाजरी! हिवाळ्यात नक्की करा आहारात समावेश, एक-दोन नाही असंख्य फायदे

मानसिक आरोग्य जपा

नैराश्येवर मात करण्यासाठी मनाचं आरोग्य जपण्याची गरज आहे. त्यासाठी काही व्यायाम देखील उपलब्ध आहेत. यातील पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे मानसिक व्यायाम करणे. ज्याला मेंटल एक्सरसाइज असंही म्हटलं जातं. या व्यायामातून इमोशनल इक्वेशन तयार होण्यास मदत होते. त्यातून भावनिकता जागरूक होते आणि समोर असलेल्या व्यक्तीचे बोलणे आपण ऐकू शकतो. तसेच गंभीर स्वरूपाचे आजार असतील तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने विविध उपचार घेतले जाऊ शकतात.

मानसिक आरोग्यासाठी हे करा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दररोज मेडिटेशन, श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला दररोज चांगल्या गोष्टींची सूचना देत राहा. दररोज सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. डिप्रेशन येण्याचे प्रमुख तीन कारणे असून यामध्ये प्रामुख्याने एकटेपणा, स्वतःचा आत्मविश्वास गमावणे आणि स्वतःची मदत स्वतः न करता येणे ही आहेत. या सगळ्या कारणांवरती आपण मेडिटेशन आणि श्वास नियंत्रण करून डिप्रेशनला मात देऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पराभवाने डोकं जड झालंय का? तुम्हाला हा गंभीर आजार, कसं बाहेर पडायचं? डॉक्टरांनी दिला सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल