Kidney Stone : तुम्हाला ही मुतखड्याचा त्रास होतोय? मग 'हे' घरगुती उपाय फायद्याचे, नक्कीच वाटेल आराम

Last Updated:

किडनी स्टोन अर्थात मुतखडा झाल्यावर त्या व्यक्तीस प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होत असतात. हा एक असा आजार आहे जो आपल्या मूत्राशयाशी निगडित असतो आणि किडनी स्टोन कोणालाही केव्हाही होऊ शकतो.

+
ह्या

ह्या पदार्थांचे सेवन केल्यास नक्कीच पडतो किडनी स्टोन वर फरक!

कुणाल दंडगव्हाळ - प्रतिनिधी
नाशिक : मुतखड्याची (किडनी स्टोन) समस्या अनुभवलेला व्यक्ती त्यातील वेदना किती त्रासदायक असतात हे नक्कीच सांगू शकेल. हा एक मूत्रमार्गाशी संबंधित आजार असून कोणत्याही वयाच्या व्यक्तीला तो होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत नेफ्रोलिथियासिस किंवा यूरोलिथियासिस म्हणून ओळखला जाणारा हा आजार शरीरातील खनिजे आणि क्षारांच्या प्रमाणात वाढ झाल्याने होतो.
पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे, जळजळयुक्त लघवी होणे, लघवीतून रक्त येणे किंवा मळमळ आणि ताप अशी लक्षणे किडनी स्टोनमुळे दिसून येतात. वेळेवर उपचार न घेतल्यास मुतखड्यामुळे मूत्रमार्गातील अडथळा वाढून शरीरातील इतर अवयवांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
advertisement
घरच्या घरी नैसर्गिक उपायांचा आधार
नाशिक येथील निसर्गोपचारतज्ज्ञ मिलिंद पोटे यांनी सांगितलेल्या काही घरगुती उपायांमुळे ऑपरेशनशिवाय मुतखडा कमी करता येतो. हे उपाय केवळ नैसर्गिक घटकांवर आधारित असून लवकरच परिणामकारक ठरू शकतात.
१. लिंबाचा रस:
लिंबू पाणी नियमित सेवन केल्याने किडनी स्टोन विरघळतो. लिंबामध्ये असणारे सायट्रिक ॲसिड कॅल्शियम स्टोन बनण्यापासून थांबवते आणि तयार झालेल्या स्टोनला लघवीतून गळून पडण्यासाठी मदत करते. शिवाय लिंबाचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो.
advertisement
२. तुळशीच्या पानांचा रस:
तुळशीमध्ये असणारे ऍसिटिक ऍसिड स्टोन विरघळवण्यासाठी उपयुक्त ठरते. तुळशीचे पानांमधील अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मूत्राशयाचे आरोग्य सुधारतात आणि पचनसंस्था चांगली ठेवतात. तुळशीचा रस सकाळी उपाशी पोटी घेतल्यास फायदेशीर ठरतो.
३. ओव्याचा रस:
ओवा हा घराघरात सहज सापडणारा घटक आहे. ओव्याचे पाणी पिण्यामुळे मूत्रमार्ग स्वच्छ राहतो आणि मुतखड्याला विरघळण्यासाठी मदत मिळते. सकाळी गरम पाण्यात ओवा टाकून सेवन केल्याने लघवीद्वारे स्टोन गळून पडतो.
advertisement
४. डाळिंबाचा रस:
डाळिंबाच्या रसामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करतात. नियमित सेवन केल्यास मुतखड्याचा आकार वाढण्यापासून थांबतो आणि लघवीतील ऍसिडिटी कमी होते.
५. गव्हांकुराचा रस:
गव्हांकुरामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे मुतखडा विरघळवून मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात. रोज सकाळी गव्हांकुराचा रस पिण्याने किडनीची अंतर्गत स्वच्छता होते.
advertisement
मुतखड्याची समस्या असल्यास खालील लक्षणे दिसू शकतात:
पाठीच्या खालच्या भागात किंवा कंबरेत तीव्र वेदना
लघवी करताना जळजळ किंवा आग होणे
गुलाबी, लालसर रंगाची लघवी
वारंवार लघवी लागणे पण लघवी नीट न होणे
मळमळ, उलटी, किंवा ताप येणे
वरील उपाय करूनही वेदना कमी होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास मुतखड्यामुळे होणाऱ्या त्रासापासून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kidney Stone : तुम्हाला ही मुतखड्याचा त्रास होतोय? मग 'हे' घरगुती उपाय फायद्याचे, नक्कीच वाटेल आराम
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement