फूट अल्सर म्हणजे काय?
फूट अल्सर म्हणजे पायाच्या त्वचेमध्ये होणारी खोलवर जखम. अनेकदा ती दिसायला छोटी वाटते, पण योग्य काळजी न घेतल्यास ती संसर्गाचे रूप घेते. पायाला सूज येणे, पू साचणे, वास येणे आणि चालायला त्रास होणे ही याची मुख्य लक्षणं आहेत.
Cot Death: ...तर झोपेत होऊ शकतो बाळाचा मृत्यू, ‘कॉट डेथ’ टाळण्यासाठी कशी घ्यावी काळजी?
advertisement
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा सुरू झाल्यापासून फूट अल्सरच्या रुग्णांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये बऱ्याच रुग्णांना मधुमेह असल्याचे निदर्शनास आले आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास ही समस्या शस्त्रक्रियेपर्यंत जाऊ शकते.
फूट अल्सरपासून आवश्यक उपाय
- पावसाळ्यात ओले शूज, सॉक्स टाळा. पाय नेहमी कोरडे ठेवा.
- दररोज पाय धुऊन सुकवून त्यावर अँटीफंगल पावडर वापरा.
- मधुमेही रुग्णांनी दररोज पाय तपासावेत.
- कोणतीही जखम, चट्टा, खवखव दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- घराबाहेर पडताना बंद पादत्राण वापरा, पाय थेट पाण्यात जाणार नाही याची काळजी घ्या.
तज्ज्ञांचा सल्ला:
पायाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पायाला झालेली लहानशी जखमही मोठ्या त्रासाचं कारण बनू शकते. पावसाळ्यातील दमट हवामान फूट अल्सरसारख्या समस्यांना आमंत्रण देतं. योग्य स्वच्छता, नियमित तपासणी आणि वेळीच उपचार हेच यावर उपाय आहेत. त्यामुळे स्वतःच्या पायांची काळजी घ्या आणि फूट अल्सरचा धोका टाळा.