यवतमाळ : रुग्णालय म्हटलं की अनेकांच्या मनात धास्ती बसते. रुग्णालयात होणार खर्च यामुळे काही जण चिंतेत असतात. त्यामुळे गोरगरीब आणि गरजू गर्भवती महिलांना मोफत उपचार घेता यावेत यासाठी यवतमाळ येथील वाघापूर येथे श्री सत्य साई संजीवनी माता आणि बाल रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात बिल काउंटर नाही. निःशुल्क सेवा मिळत असल्याने गोरगरीब आणि गरजू गर्भवती मातांसाठी हे रुग्णालय संजीवनी ठरत आहे. आतापर्यंत येथे 300 गर्भवती मातांची प्रसूती झाली आहे.
advertisement
काय काय आहेत सुविधा?
वाघापूर येथील श्री सत्य साई संजीवनी माता आणि बाल रुग्णालयात गर्भवती महिलांना तपासणी, सोनोग्राफी, गरोदरपणात आवश्यक औषधी मोफत दिल्या जात आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांची गैरसोय टाळण्यासाठी श्री मधुसूदन साई यांच्या संकल्पनेतून रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्री. श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनात रुग्णालय कार्यरत आहे.
उपचार न मिळाल्यानं हरवलं वडिलांचे छत्र, आज मुलानं सुरू केला 1 रुपयांत दवाखाना, हा आहे उद्देश्य
आईसह बालकाची घेतली जाते काळजी
नॉर्मल प्रसूतीसह सिजेरियनची आत्याधूनिक सुविधा उपलब्ध आहे. गर्भवती मातांची दुसऱ्या महिन्यापासून ते प्रसूतीपर्यंत सर्व प्रकारची काळजी घेतल्या जाते. तपासणी नंतर औषधे सोबतच प्रोटीन पावडर सर्व सुविधा निःशुल्क दिल्या जातात. भरती असलेल्या स्त्रियांना दोन वेळेचे जेवण नाश्ता मोफत दिल्या जातो. दररोज ओपिडीत 50 महिलांची तपासणी केली जाते. आतापर्यंत सुमारे 6 हजार 700 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत येथे 300 गर्भवती मातांची प्रसूती झाली आहे.
पित्तामुळे त्रासले आहात? आयुर्वेदातील ‘या’ थेरेपीमुळे होईल सुटका, एकदा फायदे पाहा
कुठलाच भेदभाव न करणारे निःशुल्क रुग्णालय
या रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याच गर्भवती मातेकडून शुल्क घेतले जात नाहीत. या रुग्णालयात कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही गरीब, गरजू, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत तसेच शहरी आणि ग्रामीण अशा सर्व रुग्णांना या ठिकाणी निःशुल्क उपचार दिले जातात. सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने या रुग्णालयाला कार्यान्वित करण्यात आले आहे. बालकांचे हृदयविकार यावर निदान करण्यासाठी ही तपासणी केली जाते. त्या संदर्भात संस्थेचे हॉस्पिटल मुंबई खारघरला किंवा रायपूर येथे आहे. त्या ठिकाणी रुग्णांना पोहोचवून गरज असल्यास शस्त्रक्रियेसाठीही मदत केली जाते. यवतमाळ येथे असलेल्या या रुग्णालयाचा गरजूंनी नक्की लाभ घ्यावा, असं आवाहन सतचिकीस्ता प्रसारक मंडळ यवतमाळ येथील सचिव प्राचार्य.डॉ. प्रकाश नांदुरकर यांनी केले आहे.