मनुके खाणे आणि मनुक्याचे पाणी पिणे हे आपल्या शरिरासाठी अत्यंत असे फायदेशीर आहे. मनुक्याचे पाणी पिल्यानंतर भरपूर असे फायदे आपल्या शरिराला होत असतात. मनुका जरी दिसायला छोटा असला तरी त्यामध्ये भरपूर अशा उच्च कॅलरीज असतात. तसेच त्यामुळे पचनसंस्था देखील चांगली होते. तसेच ज्यांना वजन वाढवायचे अशांनी या मनुकाचे पाणी सकाळी घ्यायला पाहिजे आणि भिजलेल्या मनुका देखील खायला पाहिजे, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.
advertisement
तसेच ज्यांना पचनाच्या समस्या आहेत अशांनी देखील पाणी पिले तर त्यांना ते फायदेशीर ठरते. तसेच ज्यांना रक्त कमी आहे किंवा ऍनिमिया आहे अशा व्यक्तींनी तर रोज सकाळी मनुक्याचे पाणी प्यायला पाहिजे आणि मनुका खायला पाहिजे जेणेकरून रक्त वाढ व्हायला मदत होते. ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांचे वजन जास्त आहे अशा व्यक्तींनी मनुका खाऊ नये किंवा त्याचे पाणी देखील पिऊ नये. तसेच मनुका घेताना तुम्ही तो सेंद्रियच घ्यावा. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मनुकाचे पाणी आणि मनुका खाऊ शकतात, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.