पावसाळ्यामध्ये आपण सर्व प्रकारची फळं खाऊ शकतो. यामध्ये जांभूळ, सफरचंद, लिची, आलूबुखारा, केळी, डाळिंब ही सर्व फळं आपण पावसाळ्यात खाऊ शकतो. यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आणि भरपूर प्रमाणात इतरही पोषक घटक यामध्ये मिळतात.
पोटाच्या समस्यांनी त्रस्त आहात? फाॅलो करा 'हा' घरगुती उपाय; अपचन-गॅसवर त्वरित मिळेल आराम!
advertisement
ज्यांना मधुमेह आहे अशांनी आवर्जून जांभळे खावेत. जांभळामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतं आणि ते मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं. पण ज्यांना मधुमेह आहे अशांनी केळी, चिकू, सीताफळे, द्राक्षे ही फळे खाणे शक्यतो टाळावी. कारण ही त्यांच्या आरोग्यासाठी चांगली नसतात. तसेच फळ जर तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही ती नैसर्गिक पद्धतीनेच खावी म्हणजे त्याचा कुठल्याही प्रकारचा तुम्ही जूस करून किंवा इतर कुठल्याही माध्यमातून खाऊ नये, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.
आपण फळे नैसर्गिक पद्धतीने खाल्ली तरच त्यामधून आपल्याला फायदा मिळतो. पण फळ चांगली आहे म्हणून ती किती प्रमाणात खाऊ नये. फळ ही तुम्ही सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर तुम्ही खाऊ शकता, असंही आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं.