TRENDING:

ही उपचार पद्धती ठरतेय कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान, डॉक्टरांनी सांगितली सविस्तर माहिती, Video

Last Updated:

कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि किमोथेरपी अशा उपचार पद्धती आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : कॅन्सरवरील एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून किमोथेरपीकडे पाहिले जाते. मात्र या किमोथेरपीमुळे होणाऱ्या छोट्या-मोठ्या दुष्परिणामांमुळे बरेच रुग्ण किमोथेरपी करण्यास घाबरत असतात. मात्र हे दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरुपाचे असतात. या किमोथेरपीमुळे रुग्णांना कॅन्सर विरोधात लढण्यास मदतच होत असते. याच किमोथेरपीबाबत सर्व आवश्यक माहिती कोल्हापूरच्या डॉ. रेश्मा पवार यांनी दिली असून कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या त्या संचालिका आहेत.

advertisement

कॅन्सर हा एक असा आजार आहे जो कोणत्याही जंतू किंवा विषाणूंमुळे होत नाही. खरंतर पेशी शरीरातील एक प्राथमिक घटक आहे. सामान्यतः पेशींच्या विभाजनातून त्यांची संख्या वाढूनच आपल्या शारीरिक अवयवांची वाढ होत असते. तर शरीरात सामान्यपणे वाढ होणाऱ्या पेशींसह काही पेशींची असामान्य वाढ होऊ लागते. गरजेपेक्षा जास्त आणि शरीरात कोठे रूजून होणाऱ्या पेशींच्या वाढीमुळे शरीरात काही असामान्य बदल होऊ लागतात.

advertisement

Poonam Pandey: ज्या कॅन्सरबाबत सांगून तिनं लोकांना मूर्ख बनवलं, तो अत्यंत खतरनाक! ज्यांना खरंच होतो त्यांना...

कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि किमोथेरपी अशा उपचार पद्धती आहेत. यामध्ये शस्त्रक्रियेतून तो शरीरातील वाढलेला पेशींचा भाग काढून टाकला जातो. रेडिएशन उपचारपद्धतीने बदलेलेल्या पेशींची असामान्य वाढ थांबवली जाते. तर तिसरी उपचार पद्धती म्हणजे किमोथेरपी आहे, असे डॉ. रेश्मा पवार सांगतात.

advertisement

काय आहे किमोथेरपी उपचार पद्धती?

कॅन्सरवर उपचार करण्यासाठी किमोथेरपी ही उपचार पद्धती सामान्यतः वापरली जाते. यामध्ये कॅन्सरच्या पेशंटवर काम करू शकणारे असे रुग्णाला सलाईन मधून इंजेक्शन देणे किंवा गोळ्या देणे यालाच किमोथेरपी म्हणतात. शरीरात जिथेजिथे असामान्य वर्तन करणाऱ्या पेशी असतील त्यांवर हे औषध लागू होऊन त्यांची वाढ थांबवते, असे डॉ. पवार सांगतात.

advertisement

कडधान्य, पालेभाज्या बनवताना कांदा आणि आल्याचा वापर टाळताय? मग आधी हे वाचाच

काय आहे टार्गेटेड किमोथेरपी?

आजकाल किमोथेरपीमध्ये बरेच बदल घडून आलेले आहेत. सध्या टार्गेटेड किमोथेरपी देखील रुग्णांवर प्रभावीपणे काम करत आहे. यामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये जे काही जनुकीय बदल झालेले असतात. त्याचा मोलेक्युलर टेस्टिंग किंवा इतर तपासण्या करुन अभ्यास केला जातो. पुढे त्या कॅन्सरच्या पेशींत नक्की कोणता जनुकीय बदल झालेला आहे हे पाहिले जाते. त्यावरून बरोबर त्याच गोष्टीला लक्ष्य करून औषधोपचार केला जातो. याचाच टारगेटेड किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी म्हणतात, असेही डॉ. पवार म्हणाल्या.

का आहे किमोथेरपी रुग्णांसाठी फायदेशीर?

किमोथेरपी ही उपचार पद्धती कॅन्सरग्रस्त रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याच्या टप्प्यात आणण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी ठरते. रुग्णाला किमोथेरपी देऊन आजार नियंत्रणात आणला जातो. त्यानंतरच शस्त्रक्रियेतून शरीरातून तो भाग काढून टाकला जातो.

पोहे खाल्ल्यावर जळजळ होतेय? मग खाण्याची पद्धत चुकतेय, पाहा काय घ्यावी काळजी? Video

किती रुपये येतो खर्च?

खर्चाच्या बाबतीत विचार केजा तर कोणत्या अवयवावर किंवा शरीराच्या कोणत्या भागावर उपचार करायचे यावर होणारा खर्च कमी-जास्त होत असतो. तरी देखील साधारण 2 ते 3 हजार रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत या किमोथेरपीचा खर्च येत असतो. मात्र आजकाल बऱ्याच सरकारी आणि खासगी योजनांमधून वेगैरे रुग्णाला या खर्चाच्या बाबतीत सहाय्य केले जाते.

दरम्यान, किमोथेरपीमुळे केस गळण्यापासून ते उलटी होणे असे सर्व दुष्परिणाम हे तात्पुरते स्वरुपाचे असतात. मात्र सध्या उच्च प्रतीची औषधे आणि तंत्रज्ञान यामुळे किमोथेरपी ही कॅन्सर रुग्णांसाठी एक खूप मोठं वरदान ठरल्याचे मत देखील डॉ. पवार यांनी व्यक्त केले आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
ही उपचार पद्धती ठरतेय कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान, डॉक्टरांनी सांगितली सविस्तर माहिती, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल